पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ८९] यांच्या दिवसांतील दानीएल भविष्यवादी. २०७ सुटला आणि चार मोठे प्राणी क्रमाने समुद्रांतून निघाले. हे पाहतो, तो आसने ठेवली गेली आणि दिवसांचा पुरातन बसला. त्याचे वस्त्र बर्फासारखे पांढरे होते आणि त्याचे आसन अग्नीच्या ज्यालासारखें होते. हजारों हजार त्याची सेवा करीत होते, आणि लाखोलाख त्या- समोर उभे राहिले होते. न्यायसमारंभ बसविला व पुस्तकें उघडलीं, आणि त्या प्राण्यांचा टिकण्याचा समय व काल ही ठरविली. आणि मी पाहत होतो, तेव्हां पाहा, मनुष्याच्या पुत्रासारखा एक आकाशाच्या मेघांसहित येत होता, आणि दिवसांच्या पुरातनाकडे पोहंचला, आणि त्याला प्रमुख व राज्य व वैभव दिले आणि सर्व लोक त्याची सेवा करिते झाले; त्याचे प्रभुत्व सनातन प्रमुख आहे, ते ढळायाचे नाही, आणि जें क्षीण व्हायाचे नाही असे त्याचे राज्य आहे. तेव्हां विस्मित होऊन जे उभे राहिलेले होते, त्यांतल्या एकाकडे मी गेलो, आणि म्या त्याजवळ सर्व गोष्टीविषयीं निश्चय पुसला, तेव्हां त्याने गोष्टीचे व्याख्यान मला कळविले. ते मोठे प्राणी जे चार आहेत ते चार राजे आहेत, ते पृथ्वीवर उठतील, परंतु परात्पराचे पवित्र जन राज्य घेतील आणि सदासर्वकाळ- पर्यंत राज्य भोगतील"*). _*) नबुखद्नेस्सराने जो पहिला दृष्टांत पाहिला त्याला हाही मिळतो. समुद्र हा पृथ्वी- वरील राष्ट्राच्या लाटांनी खवळलेला समुदाय दर्शवितो. चार पाणी ते चार सार्वभौम राज्यांची उपमा आहेत. दिवसांचा पुरातन हा सनातन देव आणि मनुष्याचा पुन हा खीस्त आहे. ४. मादी वंशांतील दारयावेश याच्या राज्याच्या पहिल्या वर्षांत मी दानी- पल परमेश्वराचे वचन इर्मयाकडे आले होते, त्याप्रमाणे यरूशलेमाच्या ओसाडीची सत्तर वर्षे केव्हां समाप्त होणार, याविषयी पुस्तकावरून वर्षां- ची संख्या समजण्याकरितां लक्ष दिले. तेव्हा मी गोणताट नेसून व राख फांसन उपास व देवापासीं प्रार्थना केली, आणि पाप अंगिकारून ह्मणालों: "अहाप्रभू, आह्मी पाप व दुष्टपण करून तुझे नेम व तुझे न्याय सोडून फितूर करीत आलो आहो. हे परमेश्वरा, तुला न्यायल आहे, परंतु आमच्या नोटांची लाज आहे. कांकी आमच्या पापामुळे यरूशलेम व तुझे लोक विटा पावतात. तर आतां, हे आमच्या देवा, तूं आपल्या सेवकांची प्रार्थना आणि तो जे पवित्रस्थान ओसाड पडले आहे, आणि ज्या नगराला व लोकांला तुझे नांव ठेविलेले आहे त्यांजवर आपले मुखतेज पडंटे