पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ बेलशस्सर आणि दारयावेश [प्रक० ८९ व उपकार मानीत गेला. तेव्हां ते पुरुष आले आणि त्यांस दानीएल प्रार्थना करीत असतांना सांपडला. मग त्यांनी जाऊन राजापासीं त्याज- वर दोष लावला. तेव्हां राजा फार अनुतापला. त्याने दानीएलास सोड- वावे ह्मणून त्याकडे आपले मन लावले. मग ते पुरुष राजाला ह्मणाले: "हे राजा, मादी व पारसी यांचा विधि' असा आहे की, कोणताही ठराव राजा ठरवितो तो पालटायाचा नाहीं" *). मग दानीएलाला आणा- याची आज्ञा राजाने केली आणि त्यांनी त्याला आणून सिंहांच्या गुहेत टाकले. राजाने तर दानीएलाला मटले: “तूं आपल्या ज्या देवाची सेवा निय करितोस तो तुला सोडवील." तेव्हां राजा सारी रात्र उपासी राहिला आणि त्याची झोप त्यापासून गेली. मग राजा मोठ्या पहाटेस उठून खरेने सिंहांच्या गुहेस जाऊन शोकवाणीने दानीएलाला आरोळी मारून ह्मणालाः “हे दानीएला, जिवंत देवाच्या सेवका, तूं आपल्या ज्या देवाची सेवा निय करीस तो तुला सिंहांपासून सोडवायास समर्थ आहे काय?" तेव्हां दानीएल ह्मणालाः "हे राजा, माझ्या देवाने आपला दूत पाठवून सिंहांची मुखे झांकली आहेत, ह्मणून यांनी मला उपद्रव केला नाही." तेव्हां राजाने त्याविषयी अत्यंत हर्षित होऊन दानीएलाला गुहेतून काढण्याची आज्ञा दिली आणि मटले: “ज्या पुरुषांनी दानीएलावर दोष ठेवला त्यांस सिंहांच्या गुहेत टाका." तेव्हां ते गुहेच्या तळास पोहंचल्या- पूर्वी सिंहांनी त्यांजवर प्रबळ होऊन त्यांच्या सर्व हाडांचे चूर्ण केले. तेव्हां दारयावेश याने आपल्या सर्व राष्ट्रांकडे लिहविले की: "माझ्या राज्याच्या सर्व राष्ट्रांत मनुष्यांनी दानीएलाच्या देवासमोर भय धरीत जावे, कांकी तो जिवंत देव आहे, तो सदासर्वकाळ अढळ आहे, आणि क्षीण व्हायाचे नाही, असे त्याचे राज्य आहे. तो मुक्त करितो व सोडवितो आणि तो उत्पात व आश्चर्य कमें करितो." मग दानीएल दारयावेशाच्या राज्यांत व खोरेश, पारसी, याच्या राज्यांत महखास चढला.

  • ) राजाने जी आज्ञा एक वेळ दिली ती कसाही प्रसंग आला तरी टळावयाची नाही,

राजाने देखील त्यांत अंतर करूं नये, असे होते. ३. बेलशस्सर याच्या राज्याच्या पहिल्या वर्षांत दानीएलाने एक स्वप्न पाहिले त्याचे वर्णन येणेप्रमाणे: “चार दिशेचा वारा महासमुद्रावर