पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ८९] यांच्या दिवसांतील दानीएल भविष्यवादी. २०५ ज्याच्या ठायीं आहे असा एक पुरुष तुझ्या राज्यांत आहे,आणि तुझ्या बा- पाने त्याला ज्योतिषी व दैवज्ञ यांचा अधिकारी नेमून ठेवले. तेव्हां त्यांनी दानीएलाला राजासमोर आंत नेले आणि राजा त्याला ह्मणालाः "हा लेख वाचायाला व त्याचे व्याख्यान मला कळवायाला तूं समर्थ अस- लास तर किरमीज रंगाची वस्त्रे धारण करतील आणि सोन्याची सांखळी तुझ्या गळ्यांत घातली जाईल व राज्यांतला तिसरा अधिकारी होसील." तेव्हां दानीएल ह्मणालाः "तुझी दाने तुलाच असोत. तुझा बाप नबु- खद्गस्सर याला जे झाले ते वा सर्व जाणले, तरी खा आपले मन नम्र केले नाही. परंतु त्वा आपणाला आकाशांतल्या प्रभूसी विरुद्ध उंच के- ले आहे, आणि त्याच्या मंदिराची पात्रे विटाळविली आहेत. तर हाताचा पंजा त्यापासून पाठविला आणि हा लेख लिहिला आहे आणि लेख तो हाच. 'मने, मने, तकेल व फारसीन' (मोजलेला, मोजलेला, तोललेला व विभाग- लेला). आणि त्याचे व्याख्यान हेचः मने झणजे देवाने तुझे राज्य मोजून समाप्त केले; तकेल: ह्मणजे तूं तागडीने तोलिला असतां उणा निघाला आहेस; फारसीनः ह्मणजे तुझें राज्य विभागले असतां मादी व पारसी यांस दिले आहे." तेव्हां बेलशस्सराने आज्ञा केली की दानीएलाला किरमीज रंगाची वस्त्रे लेववून तो राज्यांतला तिसरा अधिकारी आहे, असे त्या- समोरून गाजवावे. परंतु त्याच रात्री बेलशस्सर याचा घात झाला आणि दारयावेश मादी याने राज्य घेतले. २. आणि जे सगळ्या राज्यावर असावे असे १२० अधिकारी नेमून ज्यांवर मुख्य दानीएल होता असे तिघे अधिपति दारयावेशाने त्या एकशे विसांवर ठेविले. तेव्हां दानीएल त्या अधिकाऱ्यांवर विशिष्ठ झाला. कांकी त्याच्याठायीं उत्तम आत्मा होता आणि त्याला सगळ्या राज्यावर स्थापावें असी कल्पना राजा करीत होता. तेव्हां अधिपति यांनी दानीएलावर निमित्त सांपडावे ह्मणून शोधले, परंतु काही सांपडे ना. तेव्हां त्यांनी राजा- कडून ह्मणविले: “जो कोणी तीस दिवसांपर्यंत राजा जवळच्या वांचून कोणत्याही देवाजवळ किंवा मनुष्याजवळ विनंती करील तो सिंहांच्या गुहेत कला जाईल. दानीएल हे ऐकून आपल्या घरास गेला, आणि त्याच्या कोठडीच्या खिडक्या यरूशलेमाकडे उघडल्या असतां पूर्वी तो करीत असे तसा प्रतिदिवसीं तीन वेळा गुडघे टेकून आपल्या देवासमोर प्रार्थना करीत