पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पापांत पतन पावणे. [प्रक० ३ सूचना.-हिंदु लोक वरचेवर पुसतात की: "सैतानाला कोणी उत्पन्न केले? देवाने त्याला उत्पन्न केले की नाही?" आणि असे विचारण्यांत त्यांचा हेतु असा दिसतो की, दुष्ट जो सैतान त्याला उत्पन्न केल्याचा दोष देवावर लावावा. परंतु या विचारांत गैरसमज आहे.-वरील टीकेतल्या शास्त्रलेखांत "जुना साप, सैतान, मनुष्यघातक, लबाड व लबाडीचा बाप" या संज्ञा ज्याला दिल्या आहेत तो सैतान असतांना देवाने त्याला उत्पन्न केले असे नाही, तर खरेपणरूप वस्तींत वास करणारे जे दिव्य दूत त्यांपैकीं तो एक असतांना देवाने त्याला उत्पन्न केले. तो प्रथम पवित्र दूत होता, परंतु त्याने आपली पहिली स्थिति राखली नाहीं, ह्मणजे तींत तो राहिला नाही तर गर्वाने फुगून देवाच्या विरुद्ध फितूर- खोर होऊन पापी झाला आणि तेव्हापासून त्याला सैतान ह्मणजे विरो- धी असें नांव प्राप्त झाले. देवाने त्याला पवित्र वस्तींतून काढून टाकले व आतां तो सर्वकाळच्या दंडासाठी नेमन ठेविला आहे (२ पेत०२. ४.) तथापि त्याला काही प्रकारची थोडीसी मोकळीक आहे' ह्मणून तो मनुष्यांमध्ये येऊन त्यांस फसवितो. २. तेव्हां उभयतांचे डोळे उघडले, आणि आपण नागवी असे त्यांस कळले; मग त्यांनी अंजिराची पाने शिबून आपणासाठी आच्छादने केली*). नंतर आदाम व त्याची बायको ही परमेश्वर देवाच्या दृष्टीपासून बागांतील झाडांच्या मध्ये लपाली. आणि परमेश्वर देव आदामाला हाक मारून त्याला बोललाः "तूं कोठे आहेस?" तेव्हां आदाम बोलला: “म्या बागामध्ये तुझा शब्द ऐकला आणि मी नागवा आहे ह्मणून भ्यालों व लपालो." मग देव बोललाः "तूं नागवा असे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे तूं खाऊं नको ह्मणून म्या तुला आज्ञा दिल्ही, त्याचे बा खालें आहे काय ?" मग आदाम ह्मणालाः “जी बायको त्वा मला दिली तिने मला दिले आणि म्या खाले.” मग परमेश्वर देव स्त्रीला बोललाः “हे बा कां केले?" स्त्री ह्मणालीः “सापाने मला भुलविले आणि म्या खाले." मग परमेश्वर देव सापाला बोललाः “ला हे केले आहे यामुळे सर्व ग्रामपशू- मध्ये व सर्व वनपशृंमध्ये तूं शापित आहेस; तूं आपल्या पोटावर चालसील आणि आपल्या आयष्याच्या अवघ्या दिवसांत माती खासील. आणि मी तुइया व स्त्रीच्यामध्ये परस्पर आणि तुझें संतान व तिचें संतान