पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ बेलशस्सर आणि दारयावेश [प्रक० ८९ राजमंदिरावर चालत असतां राजा बोलत ह्मणालाः "जी म्या आपल्या राजवाड्याकरितां आणि आपल्या महिन्याच्या वैभवासाठी आपल्या बळाच्या सामर्थ्याने बांधली आहे, ती मोठी बाबेल हीच आहे की नाही?" हे वचन राजाच्या मुखांत असतांच आकाशांतून वाणी येऊन बोलली: "तुजपासून राज्य घेतले आहे !" आणि त्याच घटकेस नबुखद्देस्सरावर गोष्ट प्रत्ययास आली. मनुष्यांपासून घालविला असतां तो बैलाप्रमाणे गवत खाऊं लागला आणि त्याचे शरीर आकाशांतल्या दहिवराने भिजत गेले *). आणि ते दिवस समाप्त झाल्यावर नबुखद्गस्सराने आपले डोळे आकाशाकडे वर केले, आणि त्याची बुद्धि त्याला परत आली. तेव्हां त्याने परात्पराचे सुवंदन केले. आणि त्याचे राज्य त्याला परत मिळाले. त्यानंतर त्याने आपल्या ताब्यांतील सर्व राष्ट्रांस आपणाविषयीं है जे अद्भुत व चमत्कार परात्पर देवाकडून झाले ते कळण्याकरितां जाहीर केले.

  • बडेपणाचे अनेक प्रकार आहेत. त्यात एक असा आहे की, मनुष्य आपण बन-

पश आहो असे मनांत आणितो, आणि या विलक्षण विचाराने वनपाची रूटी गया करून त्याप्रमाणे वागतो. हा प्रकार नवुखद्गुरसराला झाला असावा. प्रक° ८९. बेलशस्सर आणि दारयावेश यांच्या दिवसांतील दानीएल भविष्यवादी. (दानि० ५-९.) १. नबुखद्गस्सराच्या मागे बेलशस्सर राजा झाला. त्याने एका दिवसीं आपल्या महाजनांस भोजन केले. तेव्हां तो द्राक्षारस पीत असतां यरूशलेमांत जे मंदिर होते त्यांतून जी सोन्याची व रुप्याची पात्रे आपला बाप नबुखद्नेस्सर याने नेली होती ती आणावी, ह्मणून त्याने आज्ञा केली. यांतन पितां पितां यांनी सोन्याच्या व रुप्याच्या, पितळाच्या, लोखंडाच्या व लांकडाच्या व दगडाच्या देवांस स्तविले. त्याचघटकेस मनुष्याच्या हाताच्या बोटांनी समईसमोर राजमंदिराच्या भिंतीच्या गिलाव्यावर लिहिले. हे पाहन राजाचे मुखतेज पालटले, तो कापून त्याचे गुडघे एकमेकांसीं अपर्ट लागले. आणि दैवज्ञ व मांत्रिक यांस मोठ्याने हाक मारून आज्ञा केली. परंतु तो लेख वाचायास किंवा त्याची व्याख्या राजाला कळवायास ते समर्थ नव्हते. तेव्हां राणी (राजाची आई) ह्मणाली: “पवित्र देवाचा आत्मा