पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ८८] नवुखद्देस्सर याच्या दिवसांतील दानीएल भविष्यवादी. २०३ मध्यांतुन निघाले आणि त्यांच्या शरिरांवर अग्नेि प्रबळ झाला नव्हता. त्यांच्या डोक्यांचे केशही हुरपळलेले नव्हते आणि त्यांची वस्त्रे पालटली नव्हती. तेव्हां राजा ह्मणालाः "ज्या देवाने आपला दूत पाठवून आपल्या ज्या सेवकांनी त्याजवर भाव ठेवला त्यांस सोडविले आहे, तो सुवंदित असो." आणि राजाने ठराव करून आपल्या ताब्यांतील सर्व राष्ट्रांस जाहीर केले की, शद्रख, मेशख व अबेद्गगो यांच्या देवाविरुद्ध जे काही अनुचित ह्मण- तील त्यांचा सत्यनाश होईल. कांकी जो याप्रमाणे सोडवायास समर्थ आहे असा दुसरा कोणताही देव नाही." तेव्हां राजाने या तीन पुरुषांस बाबेल परगण्यांत ठेवून त्यांस मोठा अधिकार दिला. ४. त्यानंतर नवुखद्नेस्सराने स्वप्न पाहिला, तो हाच. पृथ्वीमध्ये एक वृक्ष होता त्याची उंचो विशाल होती. तो वाढला व बलिष्ट झाला आणि त्याची उंची आकाशापर्यंत आणि त्याचा विस्तार पृथ्वीच्या सिमेपर्यंत पोहं. चला. त्याखाली रानांतल्या पशूस सावली मिळे व आकाशांतले पक्षी त्याच्या फांदाांवर बसत. आणि पाहा, एक जागणारा, पवित्र जन, आका- शांतन उतरला, तो मोठ्याने पुकारून ह्मणालाः "वृक्ष तोडा, तरी त्याच्या मळांचे खोड भूमीत माळांतल्या कोमळ गवतांमध्ये लोखंडी बंधनयुक्त सोडन ठेवा. तो आकाशांतल्या दहिवराने भिजत जावो, आणि पशूसंग- ती भूमीवरल्या गवतांचा त्याचा विभाग असो. त्याचे हृदय पालटून अमनुष्य होवो व पशुहृदय त्याला प्राप्त होवो, आणि त्यावर सात समय क्रमून जावोत. मनुष्यांच्या राज्यांवर परात्पर प्रभुल करितो, हे जिवतांनी जाणावे, ह्मणून जागणाऱ्याच्या ठरावाने आज्ञा आहे." तेव्हां सर्व विद्वान स्वप्नाचे व्याख्यान करायास समर्थनव्हते. शेवटी दानीएल येऊन ह्मणालाः "त्याची व्याख्या हीच आहे. हे राजा, वृक्ष तूंच आहेस,तुझे प्रमुख पृथ्वीच्या सीमेपर्यंत पोहंचले आहे, परंतु तुला मनुष्यांपासून घालवितील, रानां- तल्या पशूसंगतीं तुझी वस्ती होईल, आणि तुला बैलाप्रमाणे गवत खाऊं देतील. तथापि परात्पर प्रभुख करितो, हे तूं जाणसील, तेव्हां तो राज्य तुजकडे ठरेल. याकरितां हे राजा, माझी मसलत तुला मान्य असो; न्यायीपण करून आपली पापे आणि दीनांवर दया करून आपले अन्याय दूर कर, असे केल्याने कदाचित् तुझे स्वस्थपण लांबेल." आणि हे सर्व नबुखद्देस्सरावर आले. बारा महिन्यांनंतर बाबेलेतल्या