पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ नबुखद्देस्सर याच्या दिवसांतील दानीएल भविष्यवादी. [प्रक० ८८ स्यापील आणि ते राज्य अन्य लोकांकडे सोडण्यात येणार नाही. ते ही सर्व राज्ये मोडून नाहींसी करील, परंतु ते सर्वकाळ टिकेल" *). तेव्हां नबुखद्स्सर उपडा पडून ह्मणालाः “निश्चये तुमचा देव, देवांचा देव आणि तो रहस्य प्रगट करणारा आहे." तेव्हां राजाने दानीएलाला बाबे- लच्या सर्व परगण्यांवर अधिकारी करून त्याला देशांतील सर्व विद्वानांवर मुख्य करून ठेवले.

  • ) नबुखद्स्स राने ही जी मूर्ति पाहिली, तो चार सार्वभौम राज्ये म्हणजे पारसो,

खालदी. ग्रीक आणि रोमी यांचा, आणि या शेवटल्या राज्याच्या विभागण्याने पूर्व व पश्चिम असी जी दोन रोमी राज्ये झालों, त्यांचाही अनुक्रम व न्यांचे गूण दर्शविणारी होती. ही राज्ये सर्व अनु कमाने नाहींसी झाली, परंतु खीस्ताचे राज्य सर्वकाळपर्यंत टिकणारे असे आहे. ३. त्यानंतर नबुखद्नेस्सराने एक सोन्याची मूर्ति केली, तिची उंची साठ हात होती. आणि तिच्या जो कोणी पायां पडत नाही व भजन करीत नाहीं तो जळत्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात येईल, असा त्याने धाक घातला होता. त्या वेळेस कित्येकांनी येऊन दानीएलाच्या तीन सोबत्यांवर हे राजाची आज्ञा मानीत नाहीत, असा त्यांजवर दोष लावला. तेव्हां राजाने क्रोधाविष्ट होऊन त्यांस आपल्या समोर आणायाचा हुकूम केला. मग तो त्यांस ह्मणालाः "अहो तुमी संकल्प करून माझ्या देवांची सेवा करीत नाही काय? जो देव तुमाला माझ्या हातांतून सोडवील, तो कोणता आहे ?" तेव्हां ते बोलले: "आमच्या ज्या देवाची सेवा आह्मी करितों तो आह्माला जळत्या अमीच्या भट्टीतून सोडवायाला समर्थ आहे, तो आह्मास सोडवील, परंतु जरी नाही, तरी तुला कळो की आमी तुझ्या देवां- ची सेवा करणार नाही, आणि जी सोन्याची मूर्ति तिला आमी भजणार नाही." तेव्हां राजाने संतप्त होऊन आज्ञा केली की भट्टीला जेवढे तापण करीत असत तेवढ्यापेक्षा सातपट तापण तिला करावे. तेव्हां त्यांनी ते तीन पुरुष जळत्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकले. तेव्हां राजा विस्मित झाला आणि आपल्या मंत्र्यांस ह्मणालाः “आह्मी तिघे पुरुष अग्नीमध्ये बांधलेले टाकले नाहीत काय? पाहा! मी चौघे पुरुष मोकळे अग्नीमध्ये फिरतां पाहतो, आणि त्यांस कांहीं उपद्रव झाला नाहीं, चौथ्याचे रूप तर देवाच्या पुत्रासारखे आहे,” तेव्हां नबुखद्गस्सर जळत्या अमीच्या भट्टीच्या दाराजवळ जाऊन प्रणालाः "अहो परात्पर देवाचे सेवक हो, निघून या.” तेव्हां ते अमीच्या