पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ८८] नबुख२स्तर याच्या दिवसांतील दानीएल भविष्यवादी. २०१ नवखट्नेस्सराकडे आणले, आणि ते सर्व विद्येत निपुण व मागी लोकांपेक्षा चतर असे राजाला अढळले.

  • ) त्या देशातले विद्वान व ज्ञानी लोक मागी लोकांच्या बगीत मोजले जात असत.

यांचे काम बहुतकरून वैद्यक्रियेचे व खगोलविद्येसंबंधीचे होते, आणि ते शस्त्रवैद्य, शकन पाहणारे, स्वप्नांचा अर्थ सांगणारे आणि ज्योतिषी असे मानले जाऊन लोकांकडून मोठा सन्मान पावत असत. २. त्यानंतर नबुखद्देस्सराने स्वप्न पाहिले आणि तो व्याकुल होऊन जागा झाला. मग दैवज्ञ व ज्योतिषी यांनी येऊन आपले स्वप्न आणि त्या- चा अर्थ सांगावा ह्मणून राजाने सर्वांस बोलाविले. ते येऊन ह्मणाले: "राजाची गोष्ट सुचवायास समर्थ आहे असा मनुष्य पृथ्वीवर नाही." तेव्हां राजाने फार क्रोधयुक्त होऊन बाबेलेंतल्या सर्व विद्वानांचा नाश करायाला आज्ञा केली, आणि त्यांनी दानीएल व त्याचे सोबती यांसही वधावे ह्मणून शोधले. परंतु दानीएलाने राजापासीं विनंती करून मुदत मागन घेऊन आपल्या घरास जाऊन आपल्या सोबत्यांबरोबर देवाजवळ प्रार्थना केली. तेव्हां ते रहस्थ दानीएलाला रात्रींतल्या दृष्टांतांत प्रगट झाले. त्यावरून दानीएलाने देवाचे सुवंदन केले, आणि तो राजाकडे जाऊन ह्मणालाः “देव आकाशांत आहे आणि जे पुढल्या दिवसांत घडा- याचे आहे ते तो राजाला कळवितो आहे. हे राजा, तूं दृष्टांत पाहत होतास, तेव्हां पाहा, एक विशाल मूर्ति. त्या मूर्तीचे शिर उत्तम सोन्याचे होते. आणि तिचा ऊर व तिचे बाहू रुप्याचे होते, तिचे पोट व तिच्या मांड्या ही पितळाची होती. तिच्या नळगुड्या लोखंडाच्या होत्या आणि तिच्या पायांतला एक अंश लोखंडाचा व त्यांतला दुसरा अंश मातीचा होता. एक दगड हातांच्या कर्मावांचून छेदला, आणि त्याने त्या मूर्तीला हाणून ती ठेचून टाकली. मग तो दगड मोठा पर्वत झाला व त्याने सर्व पृथ्वी भरली. हाच स्वप्न आहे आणि त्याचे व्याख्यान सांगतो. हे राजा, ते सोन्याचे शिर तूं आहेस, आणि तुझ्यानंतर तुझ्यापेक्षां नीच असें टसरे राज्य उत्पन्न होईल. मग जे सर्व पृथ्वीवर प्रभुल करील असें अन्य कमरे राज्य पितळाचे उत्पन्न होईल. आणि चौथें राज्य लोखंडासारखें सकट होईल, परंतु ते राज्य विभागले जाईल. आणि या राज्यांच्या दिवसांत जे कधी नाहीसे होणार नाही, असे राज्य आकाशांतला देव 26