पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० नबुखद्रेस्सर याच्या दिवसांतील दानीएल भविष्यवादी. [प्रक०८ नद्यांजवळ आह्मी बसलों, होय, तेथें सीयोनाला स्मरून आह्मी रडलों. यामधील वाळुजांवर आह्मी आपल्या विणा टांगून ठेवल्या, कांतर ज्यांनी आमास बंदिवान नेले त्यांनी आमापासी गीत मागितले. आणि आमचे पीडणारे हर्ष मागत बोलले: 'आमासाठी सीयोनाचे एकादें गीत गा'. पर- क्या देशांत आमी परमेश्वराचे गीत कसे गाऊं? हे यरूशलेमा, मी तुला विसरलो तर माझा उजवा हात मला विसरो. जर मी तुला स्मरत नाहीं, जर मी आपल्या मुख्य हर्षावरती यरूशलेम उंचावीत नाही तर माझ्या तालूस माझी जीभ चिकटो." प्रक० ८८. नबुखद्रेस्सर याच्या दिवसांतील दानीएल भविष्यवादी. (दानी०१–४.) १. पाडावपणांतील प्रवासी यांपैकी राजकीय कुळांतील राजाच्या वाड्या- त सेवा करण्याजोगे व खास्यांची विद्या व भाषा शिकण्याजोगे मुलगे निव- डून घ्यावे आणि त्यांस ज्ञानी व विद्वान (मागी*) यांच्या हाताखाली ठेवा असी आज्ञा नबुखद्देस्सराने आपल्या मुख्य प्रधानाला दिली. त्यांतील दानीएल हा एक होता. याचे नाव बदलून बेल्ट शस्सर असें ते ठेविलें गेले. त्याचे सोबती शद्रख, मेशख आणि अबैद्गगो नामें होते. त्यांसाठी राजाच्या अन्नांतला व त्याच्या पिण्याच्या द्राक्षारसांतला नित्याचा वाटा राजाने नेमला होता. परंतु तेणेकरून विटाळले जाऊ नये असा निश्चय करून दानीएलाने प्रधानाला विनंती केली की, आमाला खायाला दाळ- भात आणि प्यायाला पाणी द्यावे, तो ह्मणालाः “मी राजाला भितो. का की तुमच्या प्रकारचे जे मुलगे त्यांच्या मुखपिक्षा तुमची मुखे राजाला म्लान दिसतील मग मी राजाकडे डोके गमावायाजोगा दोषी होईन" मग दानीएलाने पटले: “दहा दिवसपयंत आमास पारखावें." तेव्हां त्याने या गोष्टीविषयी त्यांचे ऐकले. मग दहा दिवस समाप्त झाल्यावर त्यांची रूपे, जे मुलगे राजाचे खात असत, त्यांच्या रूपांपेक्षा चांगली व पुष्ट दिसली. आणि देवाने त्या चौघांस सर्व विद्येत व बोधांत ज्ञान व समज दिली. आणि त्यांचा विद्याभ्यास करण्याचा काळ समाप्त झाल्यावर प्रधानाने त्यांस