पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ८७] पाडावपणांतील प्रवासी. यहेज्केल भविष्यवादी. १९९ आपल्या कळपाला तारीन, मी त्यांवर एक पालक ह्मणजे माझा सेवक दावीद ठेवीन, तो त्यांस चारील, तो त्यांस पाळील व तोच त्यांचा पालक असत जाईल" (अ० ३४, २३). "आणि मी तुह्माला नवै हृदय देईन, व नवा आत्मा तुह्मामध्ये घालीन ; मी तुमचे पाषाणाचे हृदय तुमच्या देहां- तून दूर करून तुह्माला मांसाचे हृदय देईन. आणि मी आपला आत्मा तुह्मामध्ये घालीन आणि तुह्मी माइया नेमाप्रमाणे वर्ती असे करीन. मग तुह्मी माझे न्याय पाळाल व आचराल" (अ० ३६, २६.२७). ३. यहेज्केल याला एक वेळ दृष्टांत झाला, त्याविषयी त्याने जे वर्णन केले ते असें. परमेश्वराचा हात मजवर येऊन त्याने आल्याकडून मला खोयामध्ये ठेविले आणि ते हाडांनी भरले होते, आणि ती फार शुष्क होती. आणि त्याने मला झटले: "मनुष्याच्या पुत्रा, ही हाडे सजीव होतील काय?" तेव्हां मी ह्मणालोः "हे प्रभू परमेश्वरा, तूंच जाणतोस." याने झटले: “ह्या हाडांवर भविष्य बोल." तर जसी मला आज्ञा झाली तसा मी भविष्य बोलत असतांना शब्द होता, आणि पाहा, कंपन झाले तेव्हां हाडे एकमेकांसी ह्मणजे प्रत्येक हाड आपल्या हाडासी येऊन जडली. आणि ग्या पाहिले, तेव्हां पाहा, स्नायू व मांस त्यांवर आली व कातडीने त्यांत वरती आच्छादले, परंतु त्यांच्या ठायीं कांहीं श्वास नव्हता. मग त्याने मटले: “आस्याला भविष्य बोल? हे आल्या, चोहों दिशांतून ये व या वधलेल्यांच्या ठायीं श्वास घाल, ह्मणजे हे जिवंत होतील." आणि जसी मला आज्ञा होती तसे मी भविष्य बोललो, तेव्हां त्यांच्या ठायीं श्वास आला व ते जिवंत झाले आणि फार मोठे सैन्य असे आपल्या पायां- वर उभे राहिले. मग त्याने मला मटले: “हीं हाडे इस्राएलाचे सर्व, वंश आहेत" (अ०३७). ____४. पाडावपणांतील प्रवासी लोकांची संसारसंबंधी बाहेरील स्थिति मटली तर ती परक्या देशांत बरी होती, आणि संसारसुख असल्यामुळे त्यांतील कित्येक स्वदेशास जाण्याचे देखील विसरले. परंतु त्यांमध्ये विश्वासी व धार्मिक जे होते त्यांच्या मनांत आपल्या पूर्वजांच्या देशास आपण केव्हां परत जाऊं, आणि पवित्र नगरांत आपण राहून परमेश्वराची मशोभित भजने केव्हां करूं असी उत्कंठा वारंवार येई. याविषयी १३७ गीत साक्षी आहे, त्यांत त्यांनी गायन केले ते येणेप्रमाणे: "बाबेलाच्या