पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ पाडावपणांतील प्रवासी. यहेज्केल भविष्यवादी. [प्रक० ८७ सहावा भाग. पाडावपणांतील प्रवास आणि स्वदेशास परत येणे. प्रक०८७. पाडावपणांतील प्रवासी. यहडकेल भविष्यवादी. १. पाडावपणांतील प्रवासी यांतही खोटे भविष्यवादी उठले. त्यांनी लोकांस फितवून बाबेलाच्या राजावर फितूर करण्याविषयी प्रयत्न केला. तेव्हां इर्मयाने त्यांस में पत्र लिहिले ते येणेप्रमाणे: “जे पाडावप्रवासी म्या बाबेलेस नेवविले आहेत त्या सर्वांस परमेश्वर इस्राएलाचा देव ह्मणतो की: "तुह्मी घरे बांधून त्यांत वसा व मळे लावून त्यांचे फळ खा. आणि ज्या नग- रास म्या तुह्मास पाडाव करून नेवविले त्याचे कल्याण शोधा, आणि त्या- साठी परमेश्वराची प्रार्थना करा, कांकी त्याच्या कल्याणांत तुमचे कल्याण होईल. बाबेलेस ७० वर्षे पूर्ण होतील तेव्हां मी आपले उत्तम वचन खरें करून तुह्मास या स्थानांत परत आणीन, कांकी मी जाणतो की म्या जे संकल्प तुह्माविषयी केले ते अरिष्टांचे नव्हत तर शांतीचे संकल्प आहेत" (इर्म० २९, ४. ५. ७. १०. १२). २. इर्मयाच्या बोधात्मक अर्थाने यहेजकेल भविष्यवादी यानेही पाडाव प्रवास्यांस बोध केला. परंतु यरूशलेमाचा नाश होईपर्यंत खोट्या भवि- व्यवाद्यांकडून फसून आपण आपल्या देशांत लवकर परत जाणार असी यांनी खोटी आशा धरली. परमेश्वराच्या आज्ञेवरून यहेजकेल याने त्यांची ही खोटी आशा मोडून पवित्र नगर व त्यांतले मंदिर यांचा नाश झाल्यावा- चून राहणार नाही याविषयी त्यांसी भाषण केले. तथापि आपल्या लोकां- च्या संकटांविषयी व त्यांच्या लाजीरवाण्या अवस्थेविषयी त्याने त्यांचे समाधानही करून पटले की: “परमेश्वराचे वचन ऐक, पाहा, मी, मीच