पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ . यहूदाच्या राज्याचा क्षय. प्रक० ८६ त्याला जे नाम ह्मणतील तें हेच आहे: परमेश्वर आमचे न्यायत्व, कारण परमेश्वर ह्मणतोः इस्राएलाच्या वंशांच्या आसनावर बसता पुरुष दावीदाला नाहीसा होणार नाही" (अ० ३३, १५. १८). प्रक०८६. यहदाच्या राज्याचा क्षय, २ राजे २४. २५. (२ काल० ३६. इम० ४२–४४.) १. योशीयाचा पुत्र यहोयाकीम याच्या दिवसांत बाबेलाचा राजा नवुखद्गस्सर याने येऊन यहोयाकीम आपला ताबेदार केला. नबुखद्देस्सर याने राजकुळांतील व देशाच्या संभावित कुटुंबांतील लेकरें आपल्या संग- ती नेली, त्यांमध्ये दानीएलही होता. हा पहिला पाडावपणाचा प्रवास (ईसवी सनापूर्वी ६०० वर्षे ); बाबेलाच्या ७० वर्षांच्या पाडावपणाच्या प्रवा- साचा हा प्रारंभ आहे. तीन वर्षांनी यहोयाकीम याने फितूर केल्यावरून खास्दी त्याजवर येऊन त्यांनी त्याला बाबेलास नेण्याकरितां बेडीत घात- ले, आणि तो मेला मग त्याच्या ठिकाणी त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला. त्याने केवळ तीन महिने राज्य केले. नंतर नबुखद्नेस्सराने फिरून येऊन नगरावर हल्ला करून ते हस्तगत करून घेतले. त्याने यहोयाखीनाला व देशांतील सर्व प्रतिष्ठित लोक, शिवाय सर्व सतार. लोहार व सर्व लढाऊ माणसे यांसुद्धां बाबेलास नेले, आणि यहोयाखी- नाच्या जागी त्याचा चुलता सिद्कीया राजा केला. या प्रसंगी ने पाडाव करून नेले त्यांत यहेजकेल नामे भविष्यवादी होता. २. सिदकीया यानेही परमेश्वराला जे वाईट ते केले. त्याने इर्म- याच्या बोधाकडे अगदीच अलक्ष करून आपल्या राज्याच्या नवव्या वर्षांत बाबेलाच्या राजासी फितूर केला. त्यावरून नबुखद्देस्सराने आपल्या सर्व सैन्यांसुद्धा तिसऱ्याने येऊन यरूशलेमास वेढा घातला. त्या वेळेस नगरांत अन्नावांचून लोकांस फार पीडा झाली. दोन वर्षेपर्यंत वेढा घालून शेवटी नगरांत प्रवेश केला. तेव्हां सिद्कीया पळू लागला. परंतु त्याला धरून नबुखद्गगेस्सराने त्याच्या समक्ष त्याच्या लेकरांस जिर्वे मारण्याची व त्याचे डोळे फोडून बेडीत घालून त्याला बाबेलास नेण्या- ची आज्ञा केली. यरूशलेमांतले देऊळ, राजवाडा व सर्व घरे त्याने