पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ८६] यहूदाच्या राज्याचा क्षय, १९५ जाळून टाकली आणि नगराच्या सभोवतालचा कोट पाडला. जे लोक शहरांत राहिले होते त्यांस व देशांतील वरकड लोकांस पाडाव- पणाच्या प्रवासास नेले. केवळ हलके लोकांपैकी द्राक्षमळे करणारे शेतकरी मात्र राहू दिले. परमेश्वराच्या मंदिरासमोर जे दोन पितळी खांब होते ते व पितळाचा समुद्र व देवळांतील सर्व सामान आणि जें कांहीं सोन्याचे व रुप्याचे होते ते अवघे त्याने बाबेलास नेऊन आपल्या देवाच्या घरांत आणून ठेविले. परंतु जे लोक यहूदा देशांत मागे राहिले त्यांजवर त्याने गदल्या याला अधिकारी केला आणि मग गदल्या मिसपेत राहिला (इसवी सनाच्या पूर्वी ५८८ वर्षे ). ३. पवित्र नगराचा नाश झाला त्या वेळेस इर्मया जिवंत होता. त्याने या नगराच्या नाशाविषयी विलाप करून आपल्या विलाप नामक ग्रंथांत येणे प्रमाणे लिहिले आहे. "जी वस्ती लोकभरीत असे, ती कसी एकलीच बसली आहे ? जी राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ व परगण्यांमध्ये मुख्य होती, ती कसी कर देणारी झाली आहे इ०." इर्मयाने बाबेलास आपल्या संगती यावे किंवा मागल्या लोकांबरोबर राहावे हे नबुखद्देस्सराने त्याच्या स्वाधीन ठेविल्यावरून तो गदल्यापासी राहिला. आणि गदल्या शेष राहिलेल्या लोकांस ह्मणालाः "भिऊ नका, देशांत वस्ती करा व बाबेलच्या राजाची सेवा करा, ह्मण- जे तमाला बरे होईल." परंतु राजकुळांतील इश्माएल ना गृहस्थाने दहा माणसे बरोबर घेऊन गदल्या याला व जे खास्दी त्याजपासी होते त्यांस ठार मारले. तेव्हां खास्दी देशांतील लोक येऊन कदाचित् आपणांस जिवे मारतील या भयाने सर्व लहान थोर उठून मिसरांत गेले. त्यांनी इर्मयावरही बलात्कार करून त्याला आपल्या संगतीं घेतले. परंतु मिसर देशांत त्यांच्या दुष्टाईविषयी त्यांस निषेध करणे इर्मयाने सोडून न दिल्या- मळे त्यांनी त्याला धोंडमार करून तेथे जिवे मारिलें, परवणी. शलमोनाचे राज्य विभागल्यापासून इस्राएल आणि यहूदा या दोन राज्यांचा क्षय होण्यापर्यंत दोन्ही राज्यांमध्ये ज्यांनी राज्य केले गांची नांवे व त्यांच्या राज्यांचा प्रारंभ कोणत्या वर्षी झाला हे स्पष्ट सम. जतीस येण्याकरिता त्यांची याद दिली आहे,