पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ८५] भविष्यवादी नहूम, हबक्कूक, सफन्या आणि इर्मया. १९३ याविषयीं, आणि मशीहाच्या आगमनाविषयीं भविष्य करून सांगतोः “त्या दिवसांत मी लोकांस शुद्ध भाषा परत आणून देईन त्यांनी परमेश्वरास हाक मारितांना एकचित्ताने त्याची सेवा करावी" (अ०३,९). इर्मयाहा योशीया राजाच्या दिवसांत फार तरुण असतांही भविष्यवाद्याच्या कामावर बोला- विला गेला. या कामासाठी मी योग्य नाही असे वाटून तो ह्मणालाः "अहा प्रभू परमेश्वरा, पाहा, मी बोलायाला समर्थ नाही, कारण की मी पोर आहे." परंतु परमेश्वराने त्याला उत्तर दिले: "मी पोर आहे असे बोलू नको, कांकी ब्यांकडे मी तुला पाठवीन त्या सर्वांकडे तूं जातील आणि जे मी तुला सांगेन ते तूं बोलतील. पाहा, म्या तुझ्या तोंडांत आपली वचने घातली आहेत. उपटायाला व पाडायाला, नाशायाला व मोडायाला आणि बांधायाला व लावायाला म्या तुला या दिवसी राष्ट्रां- वर व राज्यांवर ठेविले आहे" (अ० १, ६. ७.९.१०). २. नीतिमान योशीया राजानंतर परमेश्वराच्या दृष्टींत जे वाईट असे आचरण करणारे राजे फिरून झाले. आणि अधिकारी व याजक लोकां- सुद्धा दिवसंदिवस विपरीत वागू लागले. तेव्हां खास्यांकडून राज्याचा नाश आणि बाबेलास लोकांचा पाडावपणाचा प्रवास होईल याविषयी इर्मयाने भविष्य सांगून बोध केला, तरी कोणीही त्याच्या उपदेशा- कडे लक्ष दिले नाही. त्याच्या भविष्यवचनाचा ग्रंथ यहोयाकीम राजाने चाकूने कापून अमीत जाळून टाकला. तथापि इर्मयाने नवा ग्रंथ रचिला त्यांत पहिल्या ग्रंथापेक्षाही अधिक रचिले. त्यांनी त्याची थट्टा व त्याचा धिक्कार करून पाठलाग केला, त्यास मारहाण केली, कैदेत ठेवले, एकदा तर चिखलाने भरलेल्या खोल खांचेंत त्याला टाकले, आणि राजाचा शंड जो एबदमलेख नामक खूशी (सिध्धी) याच्या विनंतीवरून त्याला मरणापूर्वी खाचेतून काढण्याविषयी राजा आज्ञा देईपर्यंत तो तेथेच राहिला. परंतु परमेश्वराने त्याला "यहूदाच्या राजाप्रत व त्याच्या सरदा- रांप्रत, याजकांप्रत व देशांतील लोकांप्रत कोटबंदी नगर, लोखंडी खांब, पितळाचे कोट असे केले आहे" अ० १, २८. मशीहाच्या कालमाना- विजयीं इर्मयाने भाषण केले ते येणेप्रमाणे: "त्या दिवसांत मी दावीदाला न्यायाचा कोंब फुटे असे करीन. तो पृथ्वीत नीति व न्याय करील आणि 25H