पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ भविष्यवादी नहूम, हबक्कूक, सफन्या आणि इर्मया. [प्रक० ८५

  • ) इस्राएलोत बहुत दिवसांपासून मार्तिपूजक राजे झाल्यामुळे, लोक नियमशास्त्र

विसरून गेले होते आणि शास्त्राचे पुस्तक देखील हरवले होते. +) इस्राएल परमेश्वराचा त्याग करील त्याविषयीं जो शापाच्चार माश्याने केला होता (लेदी० २६. अनु० २८.) तो या ठिकाणांत वाचव्यावर राजाला स्पष्ट समजून आले की, जे शासन यांत सांगितले आहे ते आपल्या लोकांवर आता येऊ लागले आहे. ३. तेव्हां राजाने यहूदाचे मनुष्य लहान मोठे या सर्वांस परमेश्वरा- च्या मंदिरांत एकत्र करून नियमशास्त्रांतील सर्व वचने त्यांच्या ऐकण्यांत वाचली, आणि त्यांनी आपल्या जिवाने परमेश्वराला अनुसरावे व त्याच्या आज्ञा व त्याचे नेम पाळावे असा करार त्याने परमेश्वरासमोर केला आणि लोकांनी करार पत्करिला. अणखी राजाने मूर्तिसंबंधी सर्व अघोर विषय दूर करून उंचस्थाने व भजनवने व वेद्या जी आहाजाने व मनशाने केली होती ती अवघीं मोडून टाकली. आणि बेथेलाजवळ यराबामाने केलेली वेदी ती मोडावी आणि ज्या याजकांनी तिजवर पूर्वी यज्ञ केले त्यांची कबरेतील हाडे काढून तिजवर जाळून टाकावी ह्मणून पाठविले, असे करून देवाच्या माणसाने वेदीविषयीं जी गोष्ट सांगितली होती त्या- प्रमाणे त्यांनी ती वेदी बाटविली (प्रक० ७३ क० ३.) नंतर नियमशास्त्राच्या पुस्तकांतील लेखाप्रमाणे परमेश्वरासाठी वल्हांडण सण करावा, ह्मणन राजाने सर्व लोकांस आज्ञा केली. मोश्याच्या सर्व शास्त्राप्रमाणे जसा योशीया आपल्या सर्व अंत:करणाने व आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व शक्तीने परमेश्वराकडे फिरला तसा कोणी त्याच्या पूर्वी नव्हता. प्रक० ८. भविष्यवादी नहूम, हबक्कूक, सफन्या आणि इर्मया. १. योशीया राजाच्या दिवसांत हुल्दा नामें भविष्यवादीण इजशि- वाय नहूम, हबकूक, सफन्या आणि इमेया हेही भविष्यवादी होते? नहम याने निनव्याच्या नाशाविषयीं भविष्य केले. हबकूक याने यहदा राज्याचा नाश खास्दी येऊन करतील याविषयीं, आणि यहूदा राज्याचे नाश करविणारे यांजवरही देवाचे न्यायशासन येणार, याविषयीं भविष्य- भाषण केले. सफन्या हा यरूशलेमावर देवाचे न्यायशासन येईल