पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ८४] मनश्शे आणि योशिया. १९१ इतकेच नाही, तर जे राजे पूर्वी होते त्यांहून त्याने अधिक वाईट' केले. ह्मणून परमेश्वराने त्यावर अश्शूरी येऊ दिले. त्यांनी मनश्शाला धरून बिड्या घालून बाबेलास नेले. आणि तो दुःखित होता, तेव्हां त्याने आपला देव पर- मेश्वर याची विनंती केली आणि आपल्या पर्वजांच्या देवापुढे फार नम्र झाला. तेव्हां त्याने त्याला प्रसन्न होऊन यरूशलेमास त्याच्या राज्यांत परत आणले. तेव्हां परमेश्वरच देव आहे असे जाणून मनश्शाने परके देव दूर करून परमेश्वराची सेवा करण्याविषयीं यहूदाला आज्ञा केली.- आणि मनश्शे मेला तेव्हां त्याचा पुत्र अमोन राजा झाला आणि परमेश्व- राला वाईट वाटते ते जसे त्याचा बाप मनश्शे करी त्याप्रमाणे तोही करी. परंतु त्याचा बाप मनश्शे नम्र झाला त्याप्रमाणे तो नम्र झाला नाही. तेव्हां त्याच्या चाकरांनी बंड करून त्याला त्याच्या घरांत जिवें मारिलें. २. त्यानंतर अमोनाचा पुत्र योशीया आठ वर्षांचा असतां राजा झाला आणि परमेश्वराच्या दृष्टीस जे नीट ते तो करी. त्याच्या राज्याच्या आठ- व्या वर्षी पोर असतांही तो आपला पूर्वज दावीद याच्या देवाला शोधूं लागला, आणि बाराव्या वर्षी यहूदाला व यरूशलेमाला उंचस्थानावरील व भजनवनांतील मूर्ति यांजपासून शुद्ध करूं लागला, आणि त्याने परमे- श्वराचे मंदिर यथास्थित केले. तेव्हां हिल्कीया जो मुख्य याजक याला परमेश्वराच्या मंदिरांत मोश्याच्या नियमशास्त्राचे पुस्तक सांपडले*), ते त्याने राजाला आणून वाचून दाखविले. आणि राजाने त्यांतल्या गोष्टी ऐक- ल्यावर आपली वस्त्रे फाडून मटले: “परमेश्वराचा जो क्रोध आह्मावर आहे नो मोठा, कांकी या पुस्तकांत जे लिहिलेले आहे ते आमच्या पूर्वजांनी पाळिलें नींहा" । ). तेव्हां सांपडलेल्या पुस्तकांतील वचनां विषयी परमेश्वराला विचा- रावे ह्मणून त्याने हुल्दा नामक भविष्यवादीण इजकडे पाठविले. ती ह्मणाली: "राजाला सांगाः परमेश्वर असे ह्मणतोः पाहा, मी या ठिकाणावर व यांत' राहणाऱ्यांवर या पुस्तकांतील सर्व गोष्टी आणणार आहे. कांकी त्यांनी मला सोडले आणि परक्या देवांची सेवा केली. परंतु यहूंदाचा राजा ज्याने बनास पाठविले त्याला असे सांगा: या पुस्तकांतील गोष्टी ऐकून तुझें टय मदु झाले आणि तूं नम्र होऊन मजसमोर रडलास यामुळे मी तुला पर्वजांस सुखरूप मिळवीन आणि जे अवघे वाईट मी या ठिकाणावर आणणार आहे ते तुझे डोळे पाहणार नाहीत,