पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० मनश्शे आणि योशीया. [प्रक० ८४ दूताने जाऊन अश्शरी छावणीत एक लक्ष पच्यांशी हजार मनुष्य मारिले. यावरून सन्हेरीब निघून निनवेस परत गेला. तेथे तो आपल्या देवाच्या घरांत भजन करीत असतां त्याच्या पुत्रांनी त्याला जिवे मारिलें. ३. त्या दिवसांत हिज्कीया मरणाच्या लागास येईपर्यंत रोगी झाला. तेव्हां यशाया भविष्यवादी त्याजवळ येऊन त्याला ह्मणालाः “परमेश्वर ह्मणतोः तं आपल्या घराण्याला आज्ञा दे कारण तूं मरसील." तेव्हां हिजकीया आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराकडे प्रार्थना करून फार रडला. आणि यशाया नगरांतून गेला नव्हता इतक्यांत त्याला परमे. श्वराचे वचन आले की: “परत जाऊन हिज्कीयाला सांग, म्या तझी प्रार्थना ऐकिली आणि तुझी आसवे पाहिली आहेत. पाहा, तुझ्या आय- ष्याला मी अणखी १५ वर्षे लावतो." तेव्हां यशायाने जाऊन राजाला हैं सांगितले. आणि ह्मटले अंजिराच्या ढेपाचे मलम करून गळवाला लावावे झणजे राजा बरा होईल. आणि परमेश्वराने माझे ऐकले समजण्या करितां हिज्कीयाने चिन्ह मागितले. तेव्हां यशायाने झटले. "आहाजाच्या कालयंत्रावर सावली दहा अंश पुढे जावी किंवा माघारी यावी काय?" हिज्कीया ह्मणालाः “सावलीने दहा अंश पुढे कलावे हैं हलके आहे तर सावलीने दहा अंश माघारे यावे. मग यशायाने प्रार्थना केल्यावर त्याने सावली दहा अंश माघारी आणली. या वेळेस बाबेल- चा राजा बरोदखबल्दान याने हिंज्कायाकडे पत्र व भेट पाठविली. काका हिकीयाला दुखणे लागले हे त्याने ऐकिले होते. ते या हर्षला आणि त्याने दूतांस आपली सर्व संपत्ति दाखविली. नंतर यशाया त्याला ह्मणालाः “परमेश्वराचे वचन ऐक, पाहा, असे दिवस येतील की जे कांहीं तझ्या घरांत आहे ते ब जी लेकरे तुजपासून होतील ती ही बाबेलास नेण्यांत येतील." तेव्हां हिकीयाने नम्रभाव धरला ह्मणून तो जिवंत होता तोवर परमेश्वराचा राग पेटला नाही. प्रक० ८४. मनश्शे आणि योशीया. २ राजे २१-२३. (२ काल० ३३-३५.) १. हिज्कीया याच्या ठिकाणी त्याचा पुत्र मनश्शे राजा झाला. त्याने विदेश्यांच्या अघोर कर्माप्रमाणे, आहाजाने केले होते, तसे केले