पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ८३] आहाज आणि हिज्कीया. १८९ त्यांवर सिंह सोडले आहेत. तेव्हां राजाने पाडाव केलेल्या याजकांपैकी कोणी एकाला पाठविले, तो बेथेलास जाऊन राहिला, आणि परमेश्वराचे भय कसे धरावे हे त्याने त्यांस शिकविले. तसे त्या लोकांनी परमेश्वराचें भय धरले, तरी ज्या राष्ट्रांतून ते आणलेले होते, त्यांच्या रीतीप्रमाणे ते आपल्या देवांची सेवा करीत गेले. प्रक०८3. आहाज आणि हिडकीया. २ राजे १६, १८-२०. (२ काल० २८-३६.) यशा० ३६-३९. १. ज्या काळी शल्मनेसर याने इस्राएल राज्याचा नाश केला त्या वेळेस यहदांत हिज्कीया राज्य करीत होता. त्याचा बाप आहाज याने विध- र्मी लोकांच्या अघोर कमांप्रमाणे करून आपला पुत्र अग्नीतून पार केला. तो टेकड्यांवर व सर्व हिरव्या झाडांखाली मतीस यज्ञ करीत व धूप जाळीत गेला आणि त्याने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे लावून बंद केले. परंतु हिज्कीया तो त्याचा पूर्वज दावीद याप्रमाणे परमेश्वराला नीट वाटे ते तो करी. त्याने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे फिरून उघडिले, आणि ते पवित्र करण्याकरितां याजक व लेवी यांस आज्ञा केली. आणि सर्व यहूदा व इस्त्राएल यांतून दूत पाठवून परमेश्वराकडे फिरण्याविषयीं व पवित्रस्थानापासों त्याची सेवा करण्याविषयी निरोप पाठविला. मग यरूशलमास लोकांचा फार मोठा समुदाय एकत्र मिळाला. त्यांनी मूर्ति व त्यांच्या वेद्या कादून किद्रोन ओहळांत टाकल्या. नंतर त्यांनी मोठ्या हर्षाने बेखमार भाकरीचा सण, ह्मणजे वन्हांडण सण पाळिला; कांकी शलमोन याच्या दिवसांपासून यरूशलेमांत असे झाले नव्हते. २. त्यानंतर अश्शुराचा राजा सन्हेरीब येऊन सर्व कोटबंदी नगरें घेतली आणि यरूशलेमावर हल्ला करायास त्याने मोठे सैन्य पाठविले, आणि त्याने इस्राएलाच्या देवाची निंदा केली. तेव्हां हिज्कीया राजा आपली वस्त्रे फाडून परमेश्वराच्या मंदिरांत गेला आणि त्याने निभावणी होण्याविषयी परमेश्वराची प्रार्थना केली. तेव्हां यशायाने हिज्कीयाकडे सांगून पाठ- विलें की: “परमेश्वर ह्मणतो, अश्शुराचा राजा सन्हेरीब याविषयी ला मज- सी प्रार्थना केली ती म्या ऐकली आहे." आणि त्याच रात्री परमेश्वराच्या