पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ योना भविष्यवादी. प्रक०८० कर." मग योनाने जाऊन गाजविले की : "अजून चाळीस दिवस आहे- त. मग निनवे धुळीस मिळेल!" तेव्हां निनवैतल्या लोकांनी देवाला मानून पश्चात्ताप केला आणि निनवेच्या राजाने आपला झगा आपल्या अंगांतून कादन गोणताट नेसून राखेवर बसला आणि त्याने निनवेत गाजवून सांगितले: "मनुष्यांनी व पशूनी उपास करावा व ती गोणताट नेसून देवाकडे मनापासून हाक मारोत आणि प्रत्येक आपल्या मार्गापासून फिरोत. आह्मी नाश पावू नये ह्मणून देव आपल्या संतप्त क्रोधापासन फिरेल की नाहीं है कोण जाणे?" * ) मग ते आपल्या कुमार्गापासून फिरले असे पाहून ज्या अरिष्टाविषयी बोलला होता त्याविषयी देव अन- तापला आणि त्याने ते केले नाही. _*) निनवे लोकांनी पश्चाताप केला यावरून अपश्चात्तापी इस्राएली जे देवाचे लोक त्यांनी बोध घ्यायाचा होता. आपला तारणारा खीस्त झणतो: “निनव्यांतील माणसे न्यायकाळी या पिढीच्या सगती उभी राहन इला दोषी ठरवितील; कांकी त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला, आणि पाहा, एथें योनापक्षां कोणी मोठा आहे?" (माली १२,४१). हा प्रभू खीस्ताचा बोध आपण जे खीस्ती त्या आरोही ध्यानात आणावा, कारण की ही गोष्ट आह्मास विशेषेकरून लागू आहे. ३. तेव्हां योना रागे भरून परमेश्वराजवळ बोलला: "हे परमेश्वरा,मी आपल्या देशांत होतो, तेव्हां हे माझे वचन नव्हते काय, याकरितां मी पळन जात होतो, कारण म्या जाणले की तूं कृपाळू व दयाळ, मंदक्रोध व बहुप्रसाद देव आहेस आणि आरिष्टाविषयीं अनुतापत असतोस." मग योना नगरांतून निघाला आणि पूर्वेकडे मंडप करून बसला आणि नग- राचे काय होईल हे तो पाही. आणि परमेश्वर देव याने एक भोंपळी * तयार केली आण ती रुझत योनाच्या वरती चढून त्याच्याने त्याच्या दो वरतीं सावली केली आणि योनाला भोपळीमुळे फार आनंद झाला परंत देवाने किडा तयार केला त्याने भोपळी बाधली तेव्हां ती सकन ही आणि सर्य उगवला त्याचे ऊन योनाच्या मस्तकाला बाधं लाम तो व्याकूळ होऊन आपण मरावे असे त्याने मागितले. मग देवाने त्याला ह्मटले: "भोपळीमुळे रागे भरणे तुला बरे वाटते काय?" तो ह्मणाला: "मरणापावेतो रागे भरणे मला बरे वाटते." मग परमेश्वर ह्मणाला : “ज्या भोपळीसाठी वा श्रम केले नाहीत, जिला वा वाढविले नाहीं, जी एका