पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ एलीया याचा शिष्य अलीशा.-चालू. [प्रक० ७७ तुझें अंग ययापूर्व होईल." तेव्हां नामान रागे भरून बोललाः "तो बाहेर येऊन आपला देव परमेश्वर याचे नाम घेऊन आपला हात लावून कोड्याला बरे करील असे मला वाटले होते, दमसेकाच्या नद्या इस्रा- एलाच्या सर्व जलांपेक्षा चांगल्या नाहीत काय?" असें तो रागें भरून निघाला. पुढे त्याचे चाकर त्याला ह्मणाले: “माझ्या बापा, भविष्यवाद्या- ने तुला मोठी गोष्ट सांगितली असती तर त्या केली नसती काय? तर त्याने तुला स्नान करून शुद्ध हो झटले तर करावे की नाहीं." तेव्हां त्याने यार्देनेत सात वेळां बुटकुळी मारली आणि त्याचे अंग लहान मुलाच्या अंगासारखें शुद्ध झाले, २. नंतर तो देवाच्या माणसाकडे परत येऊन बोललाः "आतां पाहा, इस्राएल वेगळा करून सर्व पृथ्वींत देव नाही असे मला कळले, तर आतां आपल्या दासापासून भेट घे." अलीशा ह्मणाला: “परमेश्वर जिवंत, मी काही घेणार नाही. तेव्हां नामान ह्मणाला: "खचरांच्या जोडीच्या ओझेभर माती आपल्या दासाला न मिळावी काय? कांकी या- पुढे तुझा दास दुस-या देवांस यज्ञ करणार नाही, परमेश्वराला मात्र करी- ल" *). अलीशा ह्मणालाः "सुखरूप जा!"-आणि तो थोडीसी वाट चालून गेला, तेव्हां गेहजीने त्याच्या मागे धावून नामानास मटले: "मा- झ्या धन्याने मला पाठवून सांगितलं आहे की, "भविष्यवाद्यांच्या पत्रांतले दोघे तरणे मजकडे आतांच आले आहेत, त्यांस एक तालांत रूपें व वस्त्रांचे दोन जोड दे !" नामान ह्मणाला: “मान्य होऊन दोन तालांत घे." मग गेहजी जाऊन आपल्या धन्यापुढे उभा राहिला, तेव्हां त्याने त्याला मटले: “गेहजी,कोठून आलास?" तो बोललाः "तुझा दास कोठे. ही गेला नव्हता." मग अलीशा त्याला ह्मणालाः "तो माणूस तुला भेटायास आपल्या रथावरून मुरडला, तेव्हां माझें मन गेले नव्हते काय? रुपे आणि वस्त्रे घेण्याचा समय आहे काय? तर नामानाचा कोड तला सर्वकाळ लगटून राहील." तेव्हां तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्या पुढून निघाला.

  • ) यहोवाच्या देशानुन मानी नेऊन दमसे कांत यहोवासाठी वेदी बांधावी असी

नामानाची इच्छा होती.