पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ७८] एलीया याचा शिष्य अलीशा.-चालू. १७९ ३. आणि योरामासी लढाई कसी करावी याविषयी अरामाचा राजा सनहदद याने आपल्या चाकरांसी विचार केला. परंतु बेनहददं आपल्या खोलीत बोलला त्या सर्व गोष्टी अलीशाने इस्राएलाच्या राजाला कळविल्या. याला दोयानांत अलीशास धरण्याकरितां राजाने मोठे सैन्य पाठवून नगर बढिले. आणि अलीशाचा गडी पाहटेस उठून बाहेर गेला तों पाहा, सैन्य व घोडे व रथ इहीं करून नगर वेढिले आहे. मग त्याने मटले: "माझ्या धन्या हायहाय! आपण कसे करावे?" अलीशा बोलला: "भिऊ नको, कांकी जे त्यांजवळ आहेत त्यांपेक्षा जे आमाजवळ आहेत ते बहत आहेत." आणि अलीशाने प्रार्थना केली की: "हे परमेश्वरा, याला विसावे यणन त्याचे डोळे उघड!" तेव्हां परमेश्वराने तरण्याचे डोळे उघ- डिले. तो पाहा, अलीशाभोवते अग्नीचे घोडे व रथ यांनी डोंगर भरलेला आहे *) आणि देवाने अराम्यांस अंधळे केले, मग अलीशाने त्यांकडे जाऊन झटले : "माझ्या मागे या, मणजे ज्या माणसाचा शोध तुह्मी क- रितां त्याकडे मी तुमास नेईन." तेव्हा त्याने त्यांस शोमरोनांत नेले. आणि अलीशाने प्रार्थना केल्यावर परमेश्वराने त्यांचे डोळे उघडिले, तर पाहा, आपण शोमरोनामध्ये आहो असे सांस दिसले. तेव्हां इस्राएलाचा राजा अलीशाला ह्मणालाः “माझ्या बापा, यांस मारूं काय?" तो बोललाः "मारूं नको तर यांपुढे अन्नपाणी वाढ, मग त्यांनी खाऊन पिऊन आ- पल्या धन्याकडे जावे."

  • ) गीत ३४,७: परमेश्वराचा दून त्याच्या भिणान्यांभोवता फेरा घालतो व त्यास

तारतो.-गीत ९१,११.१२: तुझ्या सर्व मागात तुला राखायास तो आपल्या दास आज्ञा देईल, घोड्यासी तुझ्या पायाला न लागू नये झणून ते आपल्या हातांनी नुला धरतील. इब्री १,२४: दूत हे सर्व सेवा करणारे आत्मे, तारणाचे वतन पावणारे जे त्यासाठी सेवा करायास पाठविलेले असे आहेत. ४. यानंतर बेनहदद याने शोमरोनाला वेढा घातला, आणि तेथे मोठा दुष्काळ झाला. तेव्हां अलीशा योरामाला ह्मणाला : "उद्यां या वेळेस शेकेलाला शेरभर सपीठ मिळेल." तेव्हां ज्या सरदाराच्या हातावर मजा टेकत होता त्याने मटले : “परमेश्वराने आकाशाला खिडक्या केल्या तरी असी गोष्ट घडेल काय?" अलीशा बोलला : “पाहा.तं आपल्या डोळ्यांनी पाहसील, परंतु त्यांतले खाणार नाहीस." त्याच रात्री