पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्पत्ति. प्रक० १ देणाऱ्या ज्या सर्व झाडांवर झाडाचे फळ आहे, ते म्या तुह्मास दिल्हें आहे, खाण्यासाठी तुमचे होईल" *). आणि देवाने जे उत्पन्न केले ते अवघे पाहिले, आणि पाहा, ते फार चांगले होते. आणि सायंकाळ व सकाळ होऊन साहावा दिवस झाला.- आणि आकाश व पृथ्वी व यांतील सर्व समुदाय ही झाली. मग देवाने आपले सर्व जे काम केले होते त्यापासून सातव्या दिवसीं तो स्वस्थ राहिला आणि देवाने सातव्या दिवसाला आशी- र्वाद दिल्हा आणि त्याला पवित्र केले ।).

  • ) उत्पत्तीच्या साहा दिवसांत जे काम झाले त्याचा क्रम कनिष्ठ वस्तूंपासून पर्याय पर्यायाने

उंच वस्तूंवर चढत आहे. माणूस हा शेवटला व सर्व सृष्टिभूतांचा उत्तम होऊन पृथ्वीचा धनी असा नेमला आहे, आणि हे धनीपण करायास योग्य होण्यासाठी तो देवाच्या प्रतिमे प्रमाणे उत्पन्न केला आहे. पश्चीवर देवाचा प्रतिनिधि होण्याकरिता मा- णसाला ऐश्वर्य, अधिकार, सामर्थ्य, ज्ञानवुद्धी, पवित्रता, व सुखावस्था ह्या ईश्वरी देणग्या मिळाव्या, त्याच्या कामासाठी आणि त्याच्या पदवीप्रमाण जसी त्याला गरज होती त्या- प्रमाणेच त्या त्याला मिळाल्या. ___) माणसाने आपल्या कामापासन विसावा घ्यावा असा जो शाब्बाथ दिवस, तो उत्पत्तीच्या शाब्बाथाची जसो उपमा आहे, तसेच सर्वकालिक शाब्याथ जो पुढे हो- णार, त्याचं प्रतिरूप होण्यासाठी ती नेमलेला आहे, काकी "देवाच्या लोकांसाठी शा- ध्वाथाचा विसावा राहिला आहे" इब्री ४,९.-परंतु देवाचे विसावा घेणे रिकामें वसणे आहे असे नाही, कारण की जग उत्पन्न करून त्याचा संरक्षक, पालक व नियंता असून देव सर्वदा कार्यसाधक होय. रसीस्त झणतो की: "आजपावता माझा बाप काम करीत आला ओह, आणि मोही काम करीत आला" (योह० ५ : १७). सूचना.-आकाशांतील देवाचे सेवक जे दून त्यांविषयी उत्पत्तीच्या वृत्तांतांत विशेष कांहीं सांगितले नाही, तरी त्यांविषयी असे सम- जायाचे आहे की, ह्या साहा दिवसांत जे काही काम उत्पन्न झाले त्याच्या पूर्वी दूत उत्पन्न झाले असावे, कारण देव स्वतां ईयोबाला ह्मणतो की: "जेव्हां म्या पृथ्वीचा पाया घातला, तेव्हां तूं कोठे होतास?..जेव्हां पाहटेच्या ताऱ्यांनी एकदां गाइलें व देवाच्या पुत्रांनी हर्षनाद केला, तेव्हां." (ईय० २८,४.७.)