पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक०२] उत्पत्ति. चांगले आहे असे देवाने पाहिले. मग देव बोललाः “बीज देणारे गवत व हिरवळ आणि आपल्या जातीप्रमाणे फळ देणारी झाडे ती पृथ्वी उपजवो!" आणि तसे झाले. आणि चांगले आहे, असे देवाने पाहिले. आणि सायंकाळ व सकाळ होऊन तिसरा*) दिवस झाला. मग देव बोललाः “दिवस व रात्र वेगळी करायासाठी अंतराळांत ज्योती होवोत, आणि खुणा व ऋतु व दिवस व ववे यांसाठी त्या होवोत आणि पृथ्वीवर प्रकाशायासाठी अंतराळांत ज्योती होवोत!" आणि तसे झाले, आणि देवाने दोन मोठ्या ज्योती केल्या, मोठी ज्योती दिवस चालविण्यासाठी आणि लहान ज्योती रात्र चालविण्यासाठी केली, तारेही केले. आणि चागले आहे असे देवाने पाहिले, आणि सायंकाळ व सकाळ होऊन चौथा दिवस झाला. मग देव बोललाः "श्वासवान् जीवजंतु पाणी फार उपजवो, आणि पक्षी पृथ्वीवर- ते आकाशाच्या अंतराळांत उडोत!" आणि मोठे मासे व प्रत्येक जिवंत सरपटणारा जंतु जी पाण्यापासून फार उपजली, त्यांच्या जातीप्रमाणे व प्रत्येक पक्षी त्याच्या त्याच्या जातीप्रमाणे त्यांस देवाने उत्पन्न केले, आणि देवाने त्यांस आशीर्वाद दिल्हा की: "सफळ होऊन वाढा."आणि सायंकाळ व सकाळ होऊन पांचवा दिवस झाला.

  • ) उत्पत्तीच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये उजेड सर्व सृष्टीवर सारखा व्यापला असावा.

चवथ्या दिवसी तर ग्रहमंडळ उत्पन्न होऊन सिद्ध झाले आणि त्याच दिवसी जगाचें प्रकाशविणे जसे आता आहे तसेंच व्यवस्थापित झाले. ३. मग देव बोललाः “एक एक जातींतील श्वासवान् जीव, मणजे एकएक जातींतील ग्रामपशु व सरपटणारे व वनपशु यांस पृथ्वी उपजवो!" आणि तसे झाले, आणि चांगले आहे असे देवाने पाहिले.- मग देव बोललाः “आह्मी आपल्या प्रतिछायेप्रमाणे आपल्या प्रतिमेसारिखें माणूस उत्पन्न करूं; आणि ती समुद्रातील मास्यांवर व आकाशांतील पक्ष्यांवर व पशंवर व सर्व पृथ्वीवर धनीपण करोत!" तसे देवाने आपल्या प्रतिछाये प्रमाणे माणसाला उत्पन्न केले. पुरुष व स्त्री असे त्यांस उत्पन्न केले. आणि देवाने त्यांस आशीर्वाद देऊन मटले की: " सफळ होऊन वाढाव पृथ्वी भरा आणि ती हस्तगत करा, आणि समुद्रांतील मास्यांवर व आका- शांतील पक्ष्यांवर व पृथ्वीवरील सर्व फिरणाऱ्या जिवावर धनीपण करा. पाहा, संपूर्ण पृथ्वीच्या पाठीवर जी बीज देणारी अवघी हिरवळ आणि बीज