पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ एलिया तिश्वी. [प्रक०७४ 1 ३. नंतर ईजबेल एलियाचा जीव घ्यायास टपली ह्मणून तो रानांत पळून एका झुडपाखाली बसून ह्मणालाः "हे परमेश्वरा आतां पुरे झाले, माझा प्राण घे!" आणि तो झोपी होता तेव्हां देवदताने त्याला शि- वून मटले: “उठ, खा, व पी, कांकी तुला वाट लांब आहे." त्याने पाहि- लें तो पाहा, आपल्या उशाजवळ भाजलेली भाकर व पाण्याची कुपी होती, तेव्हां तो खाऊन पिऊन त्या खाण्याच्या बळावर ४० दिवस व ४० रात्री देवाचा डोंगर होरेब *) एथवर चालला, आणि तेथल्या गहेत जाऊन राहिला. तेथे परमेश्वराचे वचन त्याकडे आले की: "एलिया, तुझे एथे काय?" तो ह्मणालाः “परमेश्वरासाठी मी फार उत्सुक असत आ- लो. कांकी इस्राएलाच्या वंशांनी तुझा करार मोडला आणि मी एकटाच राहिलों, आणि ते माझा जीव घ्यायास पाहातात." तेव्हां प्रभु त्याला ह्मणालाः “बाहेर जाऊन डोंगरावर परमेश्वरापुढे उभा राहा." तर पाहा, परमेश्वर पुढून जात असतां मोठा व बळकट वारा परमेश्वरापुढे डोगर विदारीत व खडक फोडीत होता. तथापि वान्यांत परमेश्वर नव्हता. वाऱ्यानंतर भूमीकंप झाला, तरी भूमीकंपांत परमेश्वर नव्हता. भूमीकंपानंतर अग्नि झाला, तरी अमींतही परमेश्वर नव्हता. आणि अग्नीनंतर कोमल बारीक वाणी झाली, तेव्हां एलियाने आपल्या झग्याने आपले तोंड झांकून घेतले. तेव्हां परमेश्वराने त्याला सांगितले: "चल, आपल्या वाटेने परत जा, म्या इस्राएलांत ७,००० ठेविले आहेत यांतल्या कोणी बालापुढे गुडघे टेकले नाहीत व कोणच्याही मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही." मग एलिया तेथून गेला आणि अलीशा त्याला अढळला, तो नांगरीत होता. त्यावर त्याने आपला झगा घातला. मग अलीशाने त्याच्या मागे जाऊन त्याची सेवा करीत गेला.

  • ) आतां मोडलेला करार जेथें इस्राएल लोकांनी प्रथम केला होता त्या हरेव डोंग-

रासमोर एलिया फितुरी लोकांसाठी परमेश्वरासमोर विलाप करितो. जसा मोशे तसा एलियाही मोग भविष्यवादी होता. परंतु पहिल्याने त्या वेळेस इस्त्राएलावर परमे- श्वराचा राग पेटला होता त्या वेळेस मोश्याने आडवे येऊन होरेव डोंगरापासी फितुरी लोकांसाठी मध्यस्थी केली (प्रक० ३६ का० १.), त्याच ठिकाणी आता एलियाचा राग पेटला आहे आणि त्याला शांत करणारा परमेश्वर भाहे.