पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ७५] अहाबाचे घराणे. २७३ प्रक० ७८. अहाबाचें घराणे. (१ राजे २१ व २२.-२ राजे १-२. काल० १७–२०.) (इसवी सनापूर्वी ९०० वर्षे.) १. नाबोथ इजेलकर याचा द्राक्षमळा होता तो अहाब याच्या वाड्याजवळ असून महालाला लागत होता. अहाब त्याला ह्मणालाः "तूं आपला द्राक्षमळा मला दे, ह्मणजे तो मला शाखमळा होईल, मी तुला त्यापेक्षा चांगला द्राक्षमळा देईन किंवा त्याच्या मोलाचा पैका देईन.” तेव्हां नाबोथाने झटले: “म्या आपल्या पूर्वजांचे वतन तुला द्यावे, हे परमेश्वर मजकडून घडू न देवो" *). मग अहाब खिन्न व रुष्ट होऊन आपल्या घरी आला आणि आपल्या अंथरुणावर निजून अन्न खाईना. तेव्हां ईजबल ह्मणाली: “तूं इस्राएलाचे राज्य करतोस की नाही? उठून अन्न खा व तुझे मन संतुष्ट असो, द्राक्षमळा मी तुला देईन." मग तिने इन्जेलांतील वडील व अधिकारी यांस अहाबाच्या नावाने पत्र लिहून आज्ञा केली की: "दोन दुष्ट माणसे नाबोथाच्या पुढे बसवून, त्याने देवाची व राजाची निंदा केली. असी त्यांनी त्याविषयी साक्ष द्यावी. मग तो मरे असा त्याला धोंडमार करा." आणि त्यांनी तसे केले. तेव्हां ईजबेलेने अहाबाला सांगितलें: "ऊठ. द्राक्षमळा वतन करून घे, कांकी नाबोथ मेलाच आहे." आणि तो द्राक्ष- मळा वतन करून घ्यायास तेथे गेला, तेव्हां एलिया परमेश्वराकडन त्याला भेटायास येऊन त्याला ह्मणाला : “परमेश्वर ह्मणतो, ज्या ठिकाणी कत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटून घेतले, तेथे कुत्रीं तुझेचही रक्त चाटन घेतील. पाहा, यराबामाच्या कुळासारखा तुझ्या कुळाचा क्षय करीन. अणखी कुत्रीं ईजबेलेला इजेलाच्या गांवकुसाजवळ खातील." हे ऐकून अहाबाने आपली वस्त्रे फाडून उपास केला व त्याविषयी उदास झाला. मग एलियाला परमेश्वराचे वचन झाले की: "अहाब मजपुढे नम्र झाला आहे यावरून मी ते वाईट त्याच्या दिवसांत आणणार नाही."

  • नावोथ हट्टाने द्राक्षमळा देण्यास नाकबूल झाला असे नाही, तर पूर्वजांच वतन

मोनये (लेबी० २५, २२. गण० ३६,७. ८.) असी आज्ञा होती, झणून याने नाक- वल केले आणि त्या आज्ञेविषयी मात्र तो विश्वासू राहिला.