पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ७४] एलिया तिश्वी. तेव्हां सर्व लोकांनी उत्तर देऊन झटले : " गोष्ट बरी आहे.” तेव्हां बाला- च्या भविष्यवाद्यांनी एक गोहा घेऊन तयार केला, आणि सकाळपासून दपारपर्यंत ते "हे बाला, आमास उत्तर दे" असे ह्मणत; परंतु वाणी नव्हती, उत्तर देणारा नव्हता. यास्तव जी वेदी त्यांनी बांधली होती तिजवर ते तडफडले. मग दुपारों एलिया त्यांची थट्टा करीत ह्मणालाः "मोठ्याने हाक मारा, कां तर तो देव आहे, तो ध्यान करीत असेल किंवा बाहेर गेला; किंवा वाटेवर चालत असेल कोण जाणे, तो झोपी गेला असेल व जागा केला पाहिजे." तेव्हां ते मोठ्याने हाक मारीत गेले आणि सुन्यांनी फासण्या मारून घेतल्या अशा की यांवर रक्त वाहिले. आणि सं- ध्याकाळी यज्ञ करायाच्या वेळेस एलियाने बारा धोंड्यांनी वेदी बांधली व चहुंकडे टरळी केली. गोन्ह्याचे तुकडे करून लांकडांवर ठेवले, आणि टरळी भरे इतके पाणी होमद्रव्यावरून घातले. मग त्याने असी प्रार्थना केली की: "हे परमेश्वरा, अब्राहामाच्या, इझाकाच्या व इस्राएलाच्या देवा, तूंच देव आहेस आणि मी तुझा सेवक आहे असे इस्राएलांत आज कळावे. मला उत्तर दे! हे परमेश्वरा, मला उत्तर दे!" तेव्हां परमेश्वराच्या अग्नीने पडून होमद्रव्य खाऊन टाकले व टरळीत- ले पाणी चादून घेतले. हे सर्व लोक पाहतांच उपडे पडून बोलले: "परमेश्वर तोच देव! परमेश्वर तोच देव!" मग त्यांनी बालाच्या भविष्य- वाद्यांस धरले व एलियाने त्यांस किशोन ओहळावर नेऊन तेथे वधि- लें *). आणि एलिया अहाबाला ह्मणालाः “त्वरा कर, कांकी भरपूर पावसाचा आवाज आहे." आणि एलियाने समुद्राकडे पाहायास आपल्या तरण्याला सात वेळां करमेलाच्या शिखरावर पाठविलें, आणि सातव्या वेळेस तो बोलला: “पाहा, माणसाच्या हाताएवढा लहान ढग समुद्रांतून चढत आहे.” इतक्यांत ढगांनी आकाश काळे होऊन मोठा पाऊस पडला. अहाब तर रथावर बसून इजेलास चालला, आणि एलिया इजेला- पर्यंत अहाबाच्या पुढे धांवत धांवत चालला.

  • हे जे वालाचे भविष्यवादी ते इस्राएली होते, आणि ते मूर्तिपूजक असल्याम..

शास्त्राप्रमाणे मरणदंडास योग्य होते.