पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एलिया तिश्बी. [प्रक० ७४ ळे भाकर व मांस त्याकडे आणीत असत व तो ओहळांतलें पीत असे, आणि ओहळ अटून गेला, तेव्हां परमेश्वराने त्याला मटले: “उठून सार- फयास जाऊन राहा*). तेथील विधवेने तुझे पोषण करावे ह्मणून म्या तिला आज्ञा केली आहे.” आणि तो तेथे आल्यावर पाहा, तेथली एक विधवा लांकडे गोळा करीत होती, त्याने तिला मटले: “कृपेने मला प्यायाला थोड पाणी व भाकरीचा तुकडा आणून दे." ती ह्मणालीः “परमेश्वर जिवंत, मजपासीं मूठभर पीठ' व थोडे तेल आहे; आपणासाठी व आपल्या पुत्रासाठी ते तयार करिते, ते आह्मी खाऊ नंतर मरूं." एलियाने ति- ला झटले: “परमेश्वर पाऊस पाडील या दिवसापर्यंत मडक्यांतले पीठ संपणार नाही व कुपीतले तेल सरणार नाही.” तेव्हा तिने जाऊन तयार केले, आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे झाले.--नंतर त्या बायकोचा पुत्र दुखण्यांत पडून मेला. तेव्हां तिने मटले: “हे देवाच्या माणसा, तूं माझा अन्याय सुचविण्यास आलास काय!" तेव्हां एलियाने तो मूल घेऊन आपल्या अंथरूणावर निजविला आणि त्याने मुलावर आपणाला तीन वेळां ताणून प्रार्थना केली. परमेश्वराने त्याची वाणी ऐकली, आणि मुलाचा जीव त्यामध्ये परत येऊन तो जिता झाला.

  • ) सिदोनाकडील सारफथा किंवा सारफाथ; तेथें तर ईजवेलाचा वाप अधिकरी होता.

२. आणि तीन वर्षांनी एलियाकडे परमेश्वराचे वचन आले की: "चल अहाबाच्या दृष्टीस पड,मग मी भुमीवर पाऊस पाडीन." तेव्हां एलिया जाऊन अहाबाला ह्मणाला : "सर्व इस्राएल व बालाचे ४५० भाविष्यवादी यांस करमेल डोंगरास मिळीव." अहाबाने तसे केल्यावर एलियाने सर्व लोकांस मटले: “तुह्मी कोठपर्यंत दोहो मतांमध्ये लटपटाल? यहोवा (परमेश्वर) जर देव तर त्याच्या मागें चाला; अथवा जर बाल तर त्या- च्या मागे चाला!" तेव्हां लोकांनी त्याला कांहींच उत्तर दिले नाही. मग एलिया ह्मणाला: “मी मात्र परमेश्वराचा भविष्यवादी राहिलों, आणि बालाचे भविष्यवादी ४५० मनुष्य आहेत. तर आह्मास दोन गोन्हे द्यावे. एकाचे तुकडे करून त्यांनी यज्ञास तयारी करावी आणि दुस- याचे मी तयार करीन. मगत्यांनी आपल्या देवांचे नामध्यावे आणि मी परमे- श्वराचे नाम घेईन, आणि जो देव अमीकडून उत्तर देईल तोचदेव असावा!