पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ७.] एलिया तिश्वी. १६९ खाऊ नको, पाणीही पिऊ नको.” आणि ही गोष्ट झाली तरी यराबाम आपल्या वाईट मार्गापासून फिरला नाही. ४. त्या काळी यराबामाचा पुत्र अबीया याला दुखणे लागले. तेव्हां यरा- बामाची बायकोआपला वेब पालटून अहीया भविष्यवादी (प्रक० ७२, क० १४.) ज्याला वयपरखे मंद दिसत होते, तो शिलोमध्ये होता, तेथे ती लेक- राला काय होईल हे त्याला विचारायास गेली. आणि तिचा पायरव अहीयाने ऐकिला, तेव्हां त्याने मटले: “यराबामाच्या बायको, आंत ये; तूं कशाला दुसरीचे सोंग घेतलेस? मी तर कठीण वार्ता घेऊन तुजक डे पाठविलेला आहे; जाऊन यराबामाला सांग परमेश्वर ह्मणतोः “वा अन्य देव व मूर्ति केल्या आहेत यामुळे मी तुझें कूळ नाहींसें करीन. तर उठून आपल्या घरी जा, आणि तुझे पाय नगरांत जातांच लेंकरूं मरेल. यराबामाचा तोच मान कबरेस पोहंचेल कां की त्याच्याठायीं परमेश्वरा- कडे कांहीं बरें सांपडले आहे.” आणि ती घराच्या उंबऱ्यास पोहंचली तेव्हां लेकरूं मेले. ५. यराबामाच्या मागे त्याचा पुत्र नादाब राजा झाला. त्याचा घात दोन वर्षांने बाशा याने केला. तो परमेश्वराच्या दृष्टांत वाईट करीत असतां त्याचे कूळ नाश पावले. त्यानंतर अम्री राजा झाला. त्याने शोमरीन नगर बांधले, आणि जे त्याच्या पूर्वी होते त्या सर्वांपेक्षा तो वाईट होता. अम्री याच्या ठिकाणी त्याचा पुत्र अहाब' झाला. तो यरा- बाम याच्या पापांत चालला, त्याने सिदोन्याचा राजा याची कन्या ईजबेल बायको करून घेतली आणि त्याने बालदेवाची सेवा करून शोमरोनांत त्याचे देऊळ बांधले. प्रक० ७४. एलिया तिश्बी. (१ राजे १७-१९.) १. आणि एलिया तिश्वी भविष्यवादी अहाबाला ह्मणाला : “परमे- श्वर जिवंत, मी सांगेन तोपर्यंत या वर्षांमध्ये दहिवर व पाऊस पडणार नाही." आणि परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की: "एथून जाऊन व नामे ओहळ आहे तेथे लपून राहा. तेथे कावळ्यांनी तुझे पोषण व मणन म्या त्यांस आज्ञा केली आहे." मग तो गेला आणि का 22 H