पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राज्याचे दुभागणे. यराबाम. [प्रक० ७३ लांत एक व दानांत एक आणून ठेवले (बेथेल त्याच्या राज्याची दक्षिण सीमा व दान त्याची उत्तर सीमा होती). आणि त्याने झटले: “हे इस्राएला. ज्या तुझ्या देवांनी तुला मिसर देशांतून वर आणले ते पाहा.” अणखी त्याने उंचस्थानाचे घर केले व नीच लोकांतले याजक केले आणि आठव्या महिन्यांतील पंधराव्या दिवसी (प्रक० ४० क० २.) त्याने मंडपाचा सण केला. ही गोष्ट तर पापाचे कारण झाले, कांकी लोक जाऊन वासरांस यज्ञ करूं लागले*).

  • ) सोन्याच्या वासरांच्या पूजेविषयों ( प्रक० ३६, १ टीका पाहा.) पुरातन काळी

बहुतकरून देवाचे भजन उंचस्थानांवर करीत असत. कारण की ती वेदरूप उंच- स्थाने (पर्वतांचे माथे) जणू सृष्टीतील वेदो होत्या. परंतु सभामंडप झाला त्या वेळेपासून केवळ त्यामध्येच यज्ञार्पण करावें असी आज्ञा होती. आणि तेव्हापासून उंचस्थानावर भजन करणे हे देवाच्या आज्ञेविरुद्ध मनुष्याच्या इच्छेने असून ही पापी चाल होतो. तरी उंचस्थानांवर भजन करणे हे वासरांच्या सेवेपेक्षा बरे होते, आणि राज्य दुभागल्यावर इस्राएल राज्यांत धार्मिक लोक होते त्यांस देवळात जाण्याचा इलाज नसल्यामुळे ते बहुतांशों डोंगरांवर भजनास जात असत. ३. आणि यराबाम धूप जाळायास वेदी जवळ उभा होता, तेव्हां पाहा, देवाचा माणूस परमेश्वराच्या वचनावरून यहूदांतून बेथेलास आला, तो वेदी- वर ओरडन ह्मणालाः "अगे वेदी, वेदी, परमेश्वर असे सांगतो, पाहा, दावी- दाच्या कळांत योशीया नाम पुत्र जन्मेल आणि उंचस्थानांचे जे याजक तुजवर धूप करितात त्यांस तो यज्ञाने तुजवर अपील. आणि माणसांची हाडे तुजवर जाळतील" (प्रक०८४ क० ३ पाहा). तेव्हां यराबामाने आपला हात लांबवून मटले: "याला धरा.” तेव्हां त्याचा हात वाळून गेला व त्याच्याने आपल्याकडे तो वळवेना. आणि वेदी तडकून वेदीवरली राख ओघळली. मग राजाने देवाच्या माणसाला मटले: “ माझा हात बरा व्हावा, ह्मणून परमेश्वरापासीं मजसाठी प्रार्थना कर." मग तसे होऊन त्याचा हात पहिल्यासारखा झाला. आणि राजाने देवाच्या माणसाला मटले: “मजसंगती घरी येऊन फराळ कर, मग मी तुला दान देईन. परंतु त्या माणसाने झटले: “ला आपले अर्ध घर दिले, तरी मी तुजसं- गती येणार नाही. कारण की मला आज्ञा झाली : या ठिकाणी अन्न