पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

C62) प्रक० ७३] राज्याचे दुभागणे. यरावाम.. (इसवी सनाच्या पूर्वी १०१५-९७५ पर्यंत)-जी सर्व कामे त्याच्या हातांनी केली होती त्यांकडे, आणि जे सर्व श्रम केले होते त्यांकडे त्याने पाहून मटले: “पाहा, सारी व्यर्थता व रिकामी खटपट आहे!" (उप०२,११.) मग शलमोन निजला व त्याच्या ठिकाणी त्याचा पुत्र रहबाम राजा झाला. प्रक० ७3. राज्याचे दुभागणे. यराबाम. १ राजे १२–१७. (२ काल० १०–१६.) १. शलमोन मेल्यावर सर्व इस्राएली रहबामाकडे शखेमास येऊन मणालेः "तुझ्या बापाने आमचे जूं भारी केले तर आतां तूं ते हलके कर, ह्मणजे आमी तुझी सेवा करूं." आणि रहबामाने आपला बाप शल- मोन जिता होता तेव्हां जे वडील त्याजपुढे उभे राहत असत त्यांस विचा- रून त्यांची मसलत घेतली. त्यांनी त्याला सांगितले: “जर तं आज या लोकांचे ऐकसील तर ते सर्वकाळ तुझे चाकर होतील." तथापि वडि- लांची मसलत सोडून, जे नवे तरणे त्यासंगती वाढत आले होते, त्यांस त्याने मसलत विचारली. तेव्हां ते त्याला ह्मणाले: “या लोकांसीं असे बोल की, माझा बाप तुह्मास असुडांनी शिक्षा करी, मी तर विचवांनी (ज्या चाबकांस लोखंडी गळ होते त्यांनी) तुह्मास शिक्षा करीन.” मग तो तर- ज्यांच्या मसलतीप्रमाणे लोकांसी बोलला, तेव्हां सर्व इस्राएलांनी झटलें: "दावीदाकडे आमचा काय वांटा ? इशायाच्या पुत्राकडे आमचा विभाग नाही. हे इस्राएला, आपल्या डे-यांस जा!" आणि रहवामाने अदोराम जो वसुलावर होता त्याला पाठविले. तेव्हां त्यांनी त्याला धोंडमार करून जिवे मारिले. मग रहबाम यरूशलेमास पळून गेला. नंतर लोकांनी यराबामाला बोलावून त्याला इस्राएलावर राजा केले, आणि यहदा व बन्यामीन या दोन वंशांशिवाय दावीदाच्या कुळास कोणी अनकल राहिला नाहीं (इसवी सनापूर्वी ९७५ वर्षे). २. आणि यराबामाने आपल्या मनांत झटले: “हे लोक यज्ञ करा- यास परमेश्वराच्या मंदिराकडे यरूशलमास वर गेले, तर राज्य दावीदाच्या घराण्याकडे परत जाईल." आणि त्याने दोन सान्याची वासरे करून बेणे.