पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६६ शलमोनाचे वैभव आणि त्याची पदभ्रष्टता. [प्रक० ७२ आसनावर बसविलें, परमेश्वर इस्राएलावर सर्वकाळ प्रीति करीत आहे"*). नंतर ती आपल्या देशास परत गेली.

  • ) खीरताने झटले: "दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीच्या संगती उठन इला

दोषी ठरवील; कां की तो शलमोनाचे ज्ञान ऐकायास पृथ्वीच्या शेवटांपासून आली; आणि पाहा, एथें शलमोनापेक्षां कोणी मोठा आहे." (मात्यी १२, ४२.) ३. अणखी एस्पोन गेबर (आकाबा नामें अखात) एथे शलमोनाने तारखांचा तांडा केला आणि हीरामाने आपले चाकर समुद्र जाणते ख- लाशी लोक शलमोनाच्या चाकरांसंगतीं गलबतांवर पाठविले. त्यांनी ओफीर (अबस्थान) एथे जाऊन तेथील सोने, अलमुग लांकडे, उंच पाषाण, हस्तीदंत, वानर व मोरे भरून घेऊन येत असत आणि शलमोन राजा पृथ्वीवरल्या सर्व राजांपेक्षां धनाने व ज्ञानाने थोर होता. ४. परंतु ज्या राष्ट्रांविषयीं परमेश्वराने सांगितले होते की, "त्यांजवळ जाऊं नका आणि सांस तुह्मी आपल्याजवळ येऊ देऊ नका," अशा पर- देशांतल्या बहुत बायकांवर शलमोन राजाने प्रीति केली. आणि शलमो- नाच्या मातारपणी त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळविले, आणि त्याचे मन त्याचा बाप दावीद याच्या मनासारखें पूर्णपणाने परमेश्वराकडे नव्हते. त्याच्या परक्या बायका ज्या आपापल्या देवांजवळ धूप जाळीत व यज्ञ करीत असत, त्या सर्वांसाठी त्याने उंचस्थाने बांधली. तेव्हां परमेश्वर शलमोनावर रागे भरून ह्मणाला: "तुज- कडून हे झाले ह्मणून तुझ्या पुत्राच्या हातांतून राज्य फाडून तुझ्या सेव- काला देईन. दावीदाकरितां मी तुझ्या पुत्राला एक वंश मात्र देईन." आणि त्या काळी अहीया भविष्यवादी याला यराबाम नामक फार शर पक्ष आढळला. तेव्हां अहीयाने त्याच्या अंगावरले नवे वस्त्र धरून फाडून त्याचे बारा तुकडे करून “आपणाला दाहा तुकडे घे" असे बोलून यराबामाला ह्मणालाः "परमेश्वर सांगतो मी शलमोनाच्या हातांतन राज्य फाडून घेऊन तुला दाहा वंश देईन. जर तूं माझ्या मार्गात चालसील तर मी तुजसंगती असून तुजसाठी स्थिर घर बांधीन."- शलमोनाने यरूशलेमांत राज्य केले तो काळ ४० वर्षे इतका होता.