पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ७२] शलमोनाचे वैभव आणि त्याची पदभ्रष्टता. १६५ टोळ, घले झाली, पटकी किंवा कांहीं दुखणे असले आणि तुझे लोक तजकडे फिरून या मंदिरांत तुजसी प्रार्थना करतील, तर तूं आकाशांतून यांचे ऐक. अणखी परका, जो तुझ्या इस्राएली लोकांतला नाहीं तो दूर देशांतून येऊन या मंदिराकडे प्रार्थना करील, तेव्हां तूं आकाशांत ऐकून ज्याविषयी परका हाक मारील त्या अवघ्याविषयीं कर. तुझ्या इस्राएली लोकांसारखे पृथ्वीवरील सर्व लोकांनीही तुला भ्यायास तुझें नाम जाणा- वे." आणि शलमोनाने सर्व इखाएलांसुद्धां शांत्यर्पणाचा जो यज्ञ केला तो बावीस हजार गुरे आणि एक लाख वीस हजार मेंढरे असा केला. आणि राजाने चौदा दिवस सण करून नंतर लोकांस निरोप दिला. प्रक० ७2. शलमोनाचे वैभव आणि त्याची पदभ्रष्टता. १ राजे ९–११. ( २ काल०७-९.) १. आणि शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधण्याचे समाप्त केल्यावर परमेश्वराने त्याला दुसऱ्याने दर्शन देऊन झटलै : “तुझी प्रार्थना ऐकून मी हे मंदिर पवित्र केले आहे. तुझा बाप दावीद चालला तसा तूं चाल- सील तर मी तुझें राजासन सर्वकाळ स्थापीन. परंतु जर तुह्मी माझें अनुसरण सोडाल तर मी इस्राएलास देशांतून नाहीसे करीन. आणि जे मंदिर म्या आपल्या नांवासाठी पवित्र केले आहे ते मी आपल्या दृष्टी- पासून घालवीन." २. आणि शबाची राणी शलमोनाची कीर्ति ऐकून कोडी घालन त्याची प्रचीति पाहायास फार मोठी स्वारी घेऊन यरूशलेमास आली. तेव्हां शलमोनाने तिच्या सर्व गोष्टी तिला फोडून सांगितल्या. मग शलमोनाचे सर्व ज्ञान व त्याने बांधलेले मांदर व त्याचे सर्व वैभव पाहि- ल्यावर आश्चर्य करून ती राजाला ह्मणाली: "तुझ्या कर्माविषयी व तुझ्या ज्ञानाविषयीं जें वर्तमान म्या ऐकले ते खरे होते. म्या येऊन आपल्या डोळ्यांनी पाहिल्यापूर्वी मी गोष्टीचा विश्वास ठेविला नाही आणि पाहा, आधे देखील मला सांगितले नव्हते. तुझी माणसे धन्य ! हे जे सेवक तजपढें नित्य उभे राहून तुझे ज्ञान ऐकतात ते धन्य! तुझा देव परमेश्वर यांची स्तुति असो. त्याने तुजवर सुप्रसन होऊन तुला इस्राएलाच्या