पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ शलमोन देऊळ बांधतो. [प्रक० ७१ आणि बाहेरून मजबूत दगडी भिंत वेष्टिली होती. पवित्रस्थानाची लांची चाळीस हात होती. अतिपवित्रस्थानाची लांबी बीस हाताची असून त्याच्या दाराची दोन कवाडे जैनन लांकडोंची सोन्याच्या पत्राने मढविलेली होती. पवित्रस्थानातील जें सामान लें हेच. सोन्याची धपवेदी व ब्याजवर समोर ठविलेल्या भाकरी असावयाच्या ते सोन्याचे मेज ही होती. आणखी पांच समया उजव्या हाताकडे आणि पांच समया डाव्या हाताकडे अशा दाहा समया शुद्ध सोन्याच्या होत्या. अतिपवित्रस्थानांत जैतून लाकडाचे दोन करूब सोन्याने मदविलेले होते. त्यांची उंची दाहा हात आणि त्यांचे पंख पांच पांच हात लाव होते; ते पसरले असता एकाचा पंख भिंतीला लागे आणि दुसऱ्याचा एक पंख दसऱ्या वाजच्या भिंतीला लागे आणि मध्ये एकाचा पंख दुसन्याच्या पंखाला लागत असे. ह्या मोठ्या करूवाच्या पंखाखाली दयासनाने झांकलेला जो कोश (प्रक० ३७ क०३.) तो ठेवला होता. देवळाच्या समोर दोन मोठमोठे पितळाचे खांव होते. उजवीकडील जो खांब त्याचे नांव याखीन" (स्थिरता), आणि डावीकडील जो त्याचे नाव "ववाज" (वळ) असे होते. देवळाच्या दुसऱ्या तीन बाजूवरून तीन मजली अकरा हात उंचीच्या निर- निराळ्या कोठल्या होत्या. देवाच्या चहुंकडे दोन भंगणे होती. बाहेरील अंगण लोकांसाठी आणि आंतील ते याजकवर्गासाठों होते. या शेवटच्या अंगणांत घाड्यांनी बांधलेली व तांब्याच्या पत्रांनी वष्टिलेली होमवेदी उभी होती. याजकांच्या धुण्यासाठी पितळेचा समद पांच हात उंचीचा होता, आणि त्याचा घेर तीस हातांचा असून त्याचा आकार उमललेल्या कमळासारखा होता. आणि तो वारा पितळेच्या गोन्ह्यांवर भारूद केला होता. २. आणि परमेश्वराच्या मंदिराचे काम समाप्त झाल्यावर इस्राएलाची सर्व माणसें मंडपाचा सण पाळायासाठी जमलीं. आणि याजकांनी कराराचा कोश व सभामंडप आणि पवित्रस्थानांतले सर्व सामान हीं वरती आणली. आणि याजकांनी कराराचा कोश घेऊन पवित्रस्थानांत प्रवेश केला, तेव्हां मेघाने (परमेश्वराच्या तेजाने प्रक० ३७९क० ४.) पर- मेश्वराचे मंदिर भरले. मग राजाने आपले हात आकाशाकडे पसरून सर्व समुदायाला आशीर्वाद दिला आणि बोललाः "हे इस्राएलाच्या देवा परमेश्वरा! पाहा, आकाशे व आकाशांची आकाशे तुला पुरत नाहीत तर जे मंदिर म्या बांधले ते हे कसे पुरेल! तथापि आपल्या सेवकाच्या प्रार्थनेकडे लक्ष लावन रात्रंदिवस या मंदिराकडे तुझे डोळे उघडे असावे. हे देवा, तुझ्या इस्राएली लोकांनी तुजसी पाप केले ह्मणून जर शāपुढे त्यांचा मोड होईल, किंवा त्यांनी तुजसी पाप केल्यामुळे आकाश बंद होऊन आणि पाऊस न पडून देशांत दुष्काळ पडला असला, मरी असली, जर करप, वीट,