पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ७१] शलमोन देऊळ बांधितो. सल्ला होता. आणि दानापासून बैरशेब्यापर्यंत *) यहूदा व इस्राएल यांतला प्रत्येक आपापल्या द्राक्षवेलाखाली व आपापल्या अंजिराखाली निर्भय राहत होते. आणि देवाने त्याला फारच ज्ञान व बुद्धि दिली. आणि त्याचे नांव चहुंकडल्या सर्व राष्ट्रांमध्ये होते. त्याने ३००० ह्मणी सांगितल्या व त्याची गीते १००५ होती. त्याने लबनोनांतल्या गंधसरूं- पासून भिंतीवर निघणाऱ्या जुफापर्यंत झाडांचे वर्णन केले, आणि पशू- पक्षी, सरपटणारे व मासे यांचे वर्णन केले 1). आणि शलमोनाचे ज्ञान ऐकायास सर्व राजांकडल्या सर्व लोकांतले आले. १) जसें दावीदाच तसे शलमोनाचेही राजत्व खीरताच्या राजत्वाचे प्रतिरूप आहे. परत जय पावण्याचा पराक्रम आणि शांतिसंपन्न वैभव ही जी राजकीय लक्षणे तिकडे भिन्न भिन्न होती (दावादाकडे जय पावणारा पराक्रम आणि शलमोनाकडे शांतिसंपन्न वैभव) ती रसीस्ताच्या राजवांत पर्नेपणे सर्वकाळपर्यंत एकत्र झाली आहेत. 1) शलमोनाच्या ग्रंथापैकी तीन संथ झणजे नीति, उपदेशक व शलमोनाचे गीत हे पवित्र शास्त्रांत मोजतात. प्रक० ७१. शलमोन देऊळ बांधितो. १ राजे ५-९. (२ काल० २६.) १. आणि शलमोनाने सोराचा हीराम याकडे सांगून पाठविले की: "आपला देव परमेश्वर याच्या नामासाठी मंदिर बांधायास म्या संकल्प केला आहे, तर आतां माझ्या चाकरांनी तुझ्या चाकरांसंगती लबनोनांत- ले गंधसरू तोडून तासावे ह्मणून आज्ञा दे, कां की सिदोन्यासारखें लांकडे तासायाला आमच्यामध्ये कोणी जाणत नाही." तेव्हां हीराम फार संतुष्ट होऊन बोललाः "तुझ्या सर्व मनोरथाप्रमाणे मी करीन." मग शलमोनाचे व हीरामाचे कारागीर यांनी मंदिर बांधायासाठी लांकडे तासून व चिरे घडून तयार केले. इस्राएलाचे वंश मिसरदेशांतून निघा- ल्यावर ४८० व्या वर्षी आणि शलमोनाच्या राज्याच्या चौथ्या वर्षी त्याने मंदिराचा पाया घातला, आणि सात वर्षांनी मंदिर बांधून समाप्त केले.)

  • ) दावीदाने जे ठिकाण नेमून ठेवले होने (प्रक०६९क०२.) त्या ठिकाणावर शल.

मोनाने देऊळ बांधले. ने साठ हात लांच, वीस हात रुंद आणि तीस हात उंच असे होते. भातली संपूर्ण इमारत केवळ गंधसरूंच्या लाकडांची असून सोन्याने मढविलेली होती