पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ शलमोनाचा राज्याधिकारांत प्रवेश, [प्रक० ७० समजत नाही, तर तुझ्यालोकांचा न्याय करायास, बरे वाईट यांचा विवेक करायास तूं आपल्या सेवकाला सुबुद्धि मन दे.” हे प्रभूला बरे वाटून तो स्याला बोललाः “खा असी गोष्ट मागितली,दीर्घ आयुष्य मागितले नाही व धन मागितले नाही, यावरून पाहा, म्या तुला विवेकी व ज्ञानी मन दिले आहे, की तुजसारखा तुझ्यापूर्वी कोणी झाला नाही आणि तुझ्यानंतर कोणी उठणार नाही, आणि जे खा मागितले नाहीं ते, ह्मणजे धन व वैभव ही म्या तुला दिली. आणि तुझा बाप दावीद चालला तसा जर तूं माझ्या मार्गाने चालसील तर मी तुझें आयुष्य दीर्घ करीन." ३, त्या काळी दोन बायका राजाकडे येऊन त्यांपैकी एक बोलली: "मी व ही बायको एका घरांत राहतो, आणि या बायकोचा पुत्र रात्रीं मेला, कां की ती यावर निजली. मग मी झोपेत असतां तिने माझ्या- जवळन माझा पुत्र घेऊन आपल्या उरासी निजविला, आणि आपला मेलेला पुत्र माझ्या उरासी निजविला. सकाळी मी आपल्या पुत्राला थान द्यावयास उठले, तर पाहा तो मेला. परंत सकाळी त्यावर लक्ष ला- विले तेव्हां पाहा, माझा पुत्र तो नाही." मग दुसरी बायको ह्मणाली: "असे नाही, तर जिता माशा पुत्र व मेलेला तुझा पुत्र आहे." तेव्हां राजा बोलला: “मजकडे तरवार आणा. तेव्हां त्यांनी तरवार आणली आणि राजा बोलला: "जिते लेकरूं चिरून दुभाग करा, आणि अर्धे एकीला द्या आणि अर्धे दुसरीला द्या." तेव्हां जिचा जिता पुत्र होता तिची अंतडी तिच्या पुत्रावर कळवळली, ह्मणून ती बायको बोलली: “हे माझ्या प्रभू, जिते लेकरूं तिला द्या, ते जिवे मारूं नकाच नका." पण दुसरी ह्मणाली: “तो माझा नसो, तुझाही नसो, चिरा.” मग राजाने उत्तर दिले : "जिते लेंकरूं तिला द्या, ते जिवे मारूंच नका: तीच त्याची आई आहे." आणि जो निवाडा राजाने केला तो सर्व इस्ला- एलांनी ऐकिला, आणि त्याच्या ठायीं न्याय करायास देवाचे ज्ञान आहे अते त्यांनी पाहिले. ४. आणि (फराथ) नदीपासून मिसराच्या सिमेपर्यंत जी राष्ट्रे त्या सीवर शलमोन अधिकार करीत होता, आणि ती स्याजकडे भेटी आणीत आणि त्याची चाकरी करीत गेली. आणि त्याच्या चहुंकडल्या सर्वांसी