पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ७०] शलमोनाचा राज्याधिकारांत प्रवेश. १६१ प्रक०७० शलमोनाचा राज्याधिकारांत प्रवेश. (१ राजे२-४) सन इसवी १०१५ वर्षांपूर्वी. १. आणि शलमोन आपला बाप दावीद याच्या गादीवर बसला. तेव्हां अदोनीया याने राज्य मिळविण्याकरितां अणखी प्रयत्न केले. तेव्हां शलमोनाने त्याला जिवे मारायाची आज्ञा केली. आणि अब्याथार याजक या- ला राजाने सांगितले: "अनाथोथास आपल्या शेतांस जा, कांतर तूं मरायास योग्य आहेस, तरी मी तुला जिवे मारणार नाहीं; कां की परमेश्वराचा कोश तूं वाहत असस,आणि माझा बाप दुःखित असे त्यासंगती सर्वांत तूंहीदःखित अस- स. तेव्हां परमेश्वराने एलीच्या घराण्याविषयी जे वचन सांगून ठेवले होते (प्रक०५८ क० २.३.) ते पूर्ण करायास शलमोनाने अब्याथाराला याजकप- णांतून घालवून त्याच्या ठिकाणी सादोक याला याजक केले. आणि यवाबा- ला हे वर्तमान कळले तेव्हां त्याने परमेश्वराच्या मंडपांत पळून जाऊन वेदीची शिंगे धरिता झाला. तेव्हां शलमोनाने त्याला जिवे मारायास तेथे पाठविले. आणि शिमी याला राजाने सांगितले: “तूं यरूशलेमांतच राहा, एथून कोणीकडे जाऊं नको, नाहीतर खचीत मरसील." तेव्हां शिमी ह्मणाला : “वचन उत्तम, माझ्या प्रभू राजाने सांगितले, तसेच तझा दास करील." परंतु तीन वर्षांनी शिमीचे दोन चाकर पळून गेले. तेव्हा त्यांचा शोध करायास तो गेला, आणि माघारा आला तेव्हां राजाने त्याला मटले: “परमेश्वराची शपथ आणि जी आज्ञा म्या तुला दिली ती खा कां पाळली नाहीं? परमेश्वर तुझी दुष्ठाई तुझ्याच डोक्यावर घालील." असे बोलून त्याने त्याला जिवे मारायास सांगितले *). ____*) परमेश्वराचा अभिषिक्त जो राजा त्याविषयी जे अपराधी झाले होते त्या सर्वांचा याप्रमाणे सूड घेतला गेला. भदोनीया द शिमी त्यास शलमोनाने कृपा करून राई दिले होते तेही संपादलेले शासन पावायास चकले नाहीत. २. आणि शलमोन आपला बाप दावीद याच्या नेमाप्रमाणे चालन परसे. श्वरावर प्रीति करी. आणि तो गिबोनाकडे यज्ञ करायास गेला, तेव्हां देवाने त्याला रात्रीं स्वप्नांत दर्शन दिले. मग शलमोन ह्मणाला: “हे माझ्या देवा परमेश्वरा, माझा बाप दावीद याच्या ठिकाणी ला आपल्या सेवकाला राजा केले आहे ; तरी मी लहान मुलगा (अनभ्यासी तरुण) जाणे येणे 21 ॥