पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० दावीदाचे शेवटचे दिवस. [प्रक० ६९ मेश्वराची स्तुति केली. त्यानंतर दावीद निजला आणि दावीदाच्या नगरांत त्याला पुरिले. दावीद राजाने इस्राएलावर राज्य केले तो काळ ४० वर्षे होता. (इसवी सनापूर्वी १०५५ – १०१५ पर्यंत.) सूचना. दावीद हा केवळ खीलाचा पूर्वज (प्रक० ६६.) होता असे नाही, तर त्याचे प्रतिरूप व त्याविषयीं भविष्य सांगणारा असाही होता. ज्याप्रमाणे खीस्त त्याचप्रमाणे दावीद नीचपणांतून दु:ख सहन कर- ण्याकडून व पाठलाग सोसण्याकडून मोठा होऊन पराक्रम पावला,आणि देवाच्या लोकांचा राजा व विदेशी राष्ट्रांचा पराजय करणारा असा झाला. आणि जसे परमेश्वर त्यासीं " पुढे पुष्कळ काळापर्यंत" ज्या गोष्टीं- विषयी बोलला तसे दावीदाने स्वतां "आत्म्याकडून" (माथी २२, ४३.) पुढे येणारा मशीहा राजा "दावीदाचा पुत्र आणि प्रभू जो आहे" त्या- विषयी भविष्य सांगितले. दुसऱ्या गीतामध्ये तो मशीहाकडून दे- वाच्या राज्याच्या शबूंचा जो पराजय व शासन होणार त्याचे भविष्य- रूपाने वर्णन करितो (ओवी ७ : तूं माझा पुत्र आहेस, आज म्या तुला जन्म दिला आहे ... .ओवी ८: मजपासी माग ह्मणजे मी राष्ट्रे तुझें वतन असे देईन, आणि तुझें धन पृथ्वीच्या सीमा.. ओवी १२: पुत्र रुसूं नये व त्याचा क्रोध थोडासा चेतविला असतां तुह्मी मार्ग चुकून नाश पावू नये ह्मणून त्याचे चुंबन घ्या).-बाविसाव्या गीतामध्ये खीरतावर दुःखाचा पर आला त्या समयीं त्याच्या भावना कशाहोत्या याविषयी दावीदाने वर्णन केले आहे (ओवी १: हे माझ्या देवा, माझ्या देवा, खा मला कां सोडले आहे!....ओवी १६: त्यांनी माझे हात व पाय टोचले आहेत.... आबी २८:ते आपणांसाठी माझी वस्त्रे वांटतात, आणि माझ्या पांघरुणावर पण पाडतात). अणखी एकशे दहाव्या गीतांत मशीहा जो ख्रीस्त याचे सर्वकालिक राज्य व याजकपण वर्णिले आहे. ओवी १: माझ्या प्रभला परमेश्वराने मटले: मी तुझे वैरी तुझे पादासन असे करी- पर्यंत तूं माझ्या उजव्या हाताकडे बैस . . . . ओवी १: परमेश्वराने शपथ केली आहे व तो अनुतापणार नाही, मलखीजदेकाच्या प्रकरणाप्रमाणे तूं सर्वकाळपर्यंत याजक आहेस).- एकशे पन्नास गीते जी आहेत त्यांपैकी ७३ गीतांवर दावीदाचा पत्ता लिहि- ला आहे.