पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ दावीदाचे शेवटचे दिवस. [प्रक० ६९ शत्रु तुझ्या पाठीस लागत असतां त्यांपुढून बा तीन महिने पळावे; किंवा तुझ्या देशांत तीन दिवस मरी व्हावी, हे सांग." तेव्हां दावीदाने गादाला मटले: “मी मोज्या संकटांत आहे; आतां आपण परमेश्वराच्या हातांत पडूं, कांकी याची दया मोठी आहे, माणसांच्या हातांत म्या पडूं नये." _*) दाबीदाने आपल्या राज्यांतील खानेसुमारी केली तेणेकरून केवळ त्यास पाप घडले असे वाटत नाही. तर खानेसुमारी करण्यांत त्याचा जो हेतु तो पापास कारण होता. इस्राएलांचा राजा देव आहे ; राज्य देवाचे राज्य, असे असता ते न समजन आपले राज्य सार्वभौम राज्य करावे असा त्यास मोह प्राप्त झाला हेता. २. मग परमेश्वराने इस्राएलांत मरी पाठविली, तेव्हां इस्राएली ७०,००० माणसे मेली). आणि दूताने यरूशलेमाचा नाश करायास आपला हात त्यावर लांब केला, तेव्हां परमेश्वर अनर्थाविषयीं अनुतापला. परमेश्वराचा दूत तर अरवना जो यवूसी याच्या खळ्यापासी (मोरिया डोंगरावर) होता. आणि दावीदाने पृथ्वीच्या व आकाशाच्या मध्ये उभा राहिलेला व आपली उपसलेली तरवार यरूशलेमावर काढलेली असा तो परमेश्वराचा दूत पाहिला. तेव्हां दावीद उपडा पडून ह्मणालाः "ज्याने पाप केलें तो मीच! पण या मेंढयांनी काय केले आहे ? हे देवा परमेश्वरा, आतां तुझा हात मजवर पाडावा. तो तुझ्या लोकांवर नसावा." तेव्हां दावीदाने गाद भविष्यवाद्याकडून प्रभूने आज्ञा दिली होती तिजप्रमाणे अरवनाच्या खळ्यावर वेदी बांधली आणि तिजवर होम व यज्ञ केले, आणि देवाने आकाशांतून होमाच्या वेदीवर अग्नि पाडून उत्तर दिले. तेव्हांपासून त्या ठिकाणी दावीद यज्ञ करी आणि ह्मणे की: “एथे परमेश्वराचे मंदिर बांधायाचे आहे.'

  • ) ही शिक्षा दोन प्रकारे होती. पहिलीस कारण दाबीद ; कांकी तो आपल्या शर

व लढाऊ सैन्याविषयी अभिमानी होता. दुसरी लोकांच्या योगाने, कारण त्यांनी वारं. चार परमेश्वराचा अभिषिक्त जो राजा त्याविरुद्ध फितूर केला. ३. आणि राजा वयाने वृद्ध झाला, तेव्हां अबशालोमाचा भाऊ अदोनी- - या याने यवाब व अव्याथार (प्रक०६३ क० १) यांसी आपणाला आपल्या बापाच्या मागे राजा करावा याविषयी बोलणे लावले.. परंतु भविष्यवादी नाथान याने ही गोष्ट राजाला कळविली (नाथान हा शलमोनाचा गुरू होता आणि दावीदाने शलमोनाला प्रभूच्या वचनाप्रमाणे आपल्या-