पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ६८] अबशालोम व शबा यांचे बंड. चालत असतां, पाहा, शिमी नामे शौलाच्या घराण्यांतला एक माणूस निघून आला, तो राजाला शाप देत देत व धोंडे मारीत चालून बोललाः "अरे रक्तपाती व दुष्ट माणसा! जा जा, शौलाच्या कुटुंबाचे सर्व रक्त पर- मेश्वराने तुजवर फिरविले आहे, पाहा तुझी दुर्दशा झाली, कां की तूं रक्त- पाती माणूस आहेस!" तेव्हां यवाबाचा भाऊ अबीशय राजाला ह्मणालाः "मला जाऊ दे ह्मणजे मी या मेलेल्या कुतन्याचे डोके काढून घेईन." परंतु राजा ह्मणाला : “ त्याला असूं द्या, त्याने शापावे, कां की परमेश्वराने त्याला सांगितले आहे"i).

  • आपल्या पापाची योग्य जी शिक्षा ती देवाने आता आपणाला लावली आहे, आणे

तिचे कारण मीच आहे, असे समजून दावीदाचे धैर्य अगदों खचले. या कारणास्तव तो मर्व दःख सहन करून देवाने किती वेळपर्यंत आणि कोणत्या प्रकारे आपणाला शासन करायें हें तो देवाकडे सोपन देतो. न) शिमी याने में दुर्भाषण केले त्यांत जो शाप आपल्या पापामुळे परमेश्वराकडून योग्य होता तो दावीदाला अढळला; म्हणून तो बोलला की, "त्याने शापावे, कां की परमेश्वराने शापायास त्याला सांगितले आहे." तरी यावरून शिमी निर्दोषी होतो असे नाही. प्रभच्या अभिषिक्काविषयी त्याचा जो अपराध तो देहांत दंड होण्याजोगा होता. परंत या प्रसंगी सूड घ्यावा हे दाबीदाला बरे वाटले नाही. ३. आणि अबशालोम व सर्व इस्राएली लोक *) यरूशलेमास आले. तेव्हां अहीयोफेलाने मटले: “ १२,००० माणसे घेऊन मी या रात्री दावीदाच्या पाठीस लागून तो दमलेला असता त्यावर पडेन." ही गोष्ट भवशालोमाला चांगली वाटली. तरी त्याने मटले: “हुशा काय ह्मणेल हेही आपण ऐकू." तेव्हां हृशा त्याला ह्मणाला “आपला बाप व त्याची माणसे शर आहेत है तूं जाणतोस, ह्मणून मी असी मसलत देतो की, अवघे इस्राएली लोक तुजकडे जमा व्हावे, आणि आमी त्यावर घाला घालूं मग तो व त्यासंगतीच्या सर्व माणसांतील एकही राहाणार नाही." तेव्हां अब- शालोम बोललाः "अहीयोफेलाच्या मसलतीपेक्षा हूशाची मसलत चांग- ली आहे.” तेव्हां आपली मसलत मानली नाही हे पाहून अहीथोफेलाने आपल्या घरी जाऊन गळफास घेतला. _*) यह दा आणि इस्राएल (झणजे अकरा वंश व त्यांतील मुख्य वंश एफ्राईम) यामध्य वहन काळापासन में वैमनस्य होते त्याचा उपयोग अब शालोमाने आपले स्वहित साधण्या.