पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ अबशालोम व शबा यांचे बंड. प्रक० ६८ सखी बहीण तामार इजवर बलात्कार केला होता. तेव्हां अबशालोम पळून जाऊन यवाबाने त्यासाठी विनंती केली तोवर पांच वर्षेपर्यंत त्याने आपल्या बापाचे तोंड पाहिले नाही. यवाबाची विनंती ऐकून दावीदाने फिरून त्याला आपणापासीं येऊ दिले. अवघ्या इस्राएलांत तर सौंद- र्याविषयीं अबशालोमासारखा स्तुत्य कोणी नव्हता, त्याच्या तळपाया- पासून त्याच्या माथ्यापर्यंत त्याजवर कांहीं डाग नव्हता. आणि तो आपले डोके कातरी-आणि प्रत्येक वर्षाच्या अंतीं तो ते कातरी-तेव्हां त्याच्या डोक्याचे केश २०० शेकेल (सुमारे दीड शेर) तोली. आणि अबशा- लोमाने आपल्यासाठी रथ व घोडे व आपल्या पुढे धांवायास ५० माणसे ठेवली. आणि सकाळी तो उठून वेसींच्या वाटेच्या बाजूस उभा राही, आणि कोणी वादी माणूस निवाड्यासाठी राजाकडे येई, तेव्हां तो त्याला बोलावून ह्मणे : "तूं कोणत्या नगरचा आहेस? - पाहा, तुझे वाद चांगले व नीट आहेत, परंतु तुझे ऐकायास राजाने नेमलेला असा कोणी नाही. मी या देशांत नेमलेला न्यायाधीश असलो तर बरे होते. तेव्हां सर्वांनी मजकडे यावे आणि म्या त्यांचा न्याय करावा !" आणि कोणी त्याला नमस्कार करायास जवळ आला, तेव्हां तो आपला हात पुढे करून त्याला धरी व त्याचे चुंबन घेई. याप्रमाणे सर्वांसी करून अबशालोमाने इस्राएली माणसांचे मन मनावले. मग एका दिवसीं तो २०० माणसे घेऊन हेब्रोनास गेला आणि तेथे शिंग वाजवून “अबशा- लोम राजा झाला!" असे प्रसिद्ध करविले. आणि बंड वाढून मोठे झाले. आणि अबशालोमाकडे लोक फार जमले. तेव्हां त्याने दावी- दाचा मंत्री अहीथोफेल याला बोलाविले. जी मसलत तो करी, ती कोणी देववचन विचारल्याप्रमाणे होती. परंतु अहीथोफेलाची मसलत व्यर्थ करण्याकरितां दावीदाचा स्नेही जो हूशा तोही अबशालोमाकडे गेला. आणि अबशालोमाने अमासा याला सेनापति केले. २. हे वर्तमान ऐकून दावीदाने आपल्या चाकरांस सांगितले की "उठा आपण पळू, नाहीं तर अबशालोमापासून आमची सुटका होणार नाहीं" *). तेव्हां राजा किद्रोन ओहळाच्या पार पलिकडे जाऊन आपले डाक झांकून रडत रडत अनवाहणी चालला व त्याच्या बरोबरचे सव लोक आपले डोके झांकन रडत रडत चालले, आणि दावाद पुढ