पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५३ प्रक० ६८] अबशालोम व शबा यांचे बंड. त्या दरिद्री माणसाची कोकरी घेऊन ती तयार केली." तेव्हां दावीदाने त्या माणसावर फार रागे भरून ह्मटले: “परमेश्वर जिवंत आहे, ज्या माणसाने हैं केले तो मरायास योग्य आहे!" तेव्हां नाथान दावीदाला ह्मणाला: "तो माणस तूंच आहेस! उरीयाची बायको ला तुझी बायको करून घेतली आणि त्याला अम्मोनी लोकांच्या तरवारीने जिवे मारिलें आहे, परमेश्वर ह्मणतो : पाहा, मी तुझ्या घराण्यांतूनच तुजवर अरिष्ट उत्पन्न करीन." मग दावीद ह्मणालाः " म्या परमेश्वरापासीं पाप केले आहे"*). तेव्हां नाथानाने मटलेः “परमेश्वराने तर तुझे पाप दूर केले आहे, तूं मरणार नाहीस. तथापि खा या कृत्याने परमेश्वराच्या शत्रूस निंदा करण्याचा प्रसंग प्राप्त केला, म्हणन जो पुत्र तुला बथशेबापासून झाला आहे तो खचीत मरेल." आणि तो मूल दुखणाईत होऊन मेला. त्यानंतर बथशेबा दावीदाला अणखी पत्र प्रसवली, त्याने त्याचे नांव शलमोन ठेवले, आणि परमेश्वराने त्याजवर प्रीति केली. त्याला दावीदाने नाथान भविष्यवादी याच्या हाताखाली ठेवले आणि त्याने त्याला यदीद्या (परमेश्वराला प्रिय) हे नांव दिले.

  • ) आपण केलेल्या पापाना पश्चात्ताप दावीदाने केला त्याविषयी त्याने त्या वेळेस रच-

लेले ५१ वे गीत तें साक्षीरूप आहे. तो ह्मणतो: “हे देवा, तूं आपल्या कृपेप्रमाणे मजवर दया कर; आपल्या परम करुणेप्रमाणे माझे दोष पुसून टाक. मला माझ्या अन्यायापासन स्वच्छ बूं व माझ्या पापापासून मला निर्मळ कर. काकी मी आपले अपराध स्वीकारितों व माझें पाप मजपुढे नित्य आहे.... पाहा, अन्यायांत मी अपन झालों व पापांत माझ्या आईने माझे गर्भधारण केले .... माझ्या पातकांपासन आपल मख आवरून थे, आणि माझे सर्वे अन्याय पुसून टाक. हे देवा, मजमध्ये स्वच्छ हृदय उत्पन्न कर,आणि माझ्या अंगी शुद्ध आत्मा नवा कर. तूं आपल्या समोरून मला टाकं नको, आणि आपला पवित्र आत्मा मजपासून काढू नको...."-दावादाने आपल्या पापाचा पश्चाताप केला, हाणून देवाने त्यावर दया करून त्याची क्षमा केली. तरी त्याने हे पाप करून आपल्या घरावर जो नाश आणला तो होण्यामध्ये इहलोकी परमेश्वराकडन काही अंतर झाले नाही. त्या नाशाचा प्रारंभ अवशालोम याचा बंधुघात व फितूर होय. प्रक० ६८. अबशालोम व शबा यांचे बंड. (२ शमु० १३-२०.) नंतर असे झाले की दावीदाचा पुत्र अबशालोम याने आपला सापन बंध अग्नीन याला जिवे मारिले. कांकी त्याने अबशालोमाची 20 II