पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ दावीदाचे पाप आणि त्याविषयी पश्चात्ताप. [प्रक० ६७ प्रक० १७. दावोदाचें पाप आणि त्याविषयों पश्चात्ताप. २ शमु० १० - १२. (गीत ५१.) १. यानंतर अम्मोनांचा राजा मेला, तेव्हां आपल्या बापाविषयी त्याचे समाधान करायास दावीदाने त्याचा पुत्र हानून याकडे निरोप पाठवि- ला. तेव्हां तेहेर असे समजून हानूनाने दावीदाच्या चाकरांस धरून त्यां- ची अर्धी दाढी मुंडून आणि त्यांचे अर्धे वस्त्र कापून त्यांस वाटेस लाविले, आणि इस्राएलांसी लढाई करायात अम्मोनी आपली तयारी करूं लागला. तेव्हां दावीदाने अम्मोन्यांचा नाश करायास व त्यांची राब्बा नामक राज- धानी वेढायास यवाब यास सैन्यासुद्धा पाठविले. परंतु दावीद यरूशले- मांत राहिला *). आणि एका संध्याकाळी दावीद आपल्या घराच्या गची- वर फिरूं लागला. तेव्हां त्याने गच्चीवरून एका बायकोला पाहिले. ती फार सुंदर होती. ती उरीया जो हित्ती यवाबाबरोबरच्या सैन्यांतील एक होता याची बायको होती. तिचे नांव बथशेबा. तेव्हां दावीदाने यवाबाला पत्र लिहून आज्ञा केली कीः “उरीयाला शजूंनी हाणून मारावे ह्मणून त्याला तुंबळ लढाईच्या तोंडी ठेवून त्याला सोडून मागे हटा." तेव्हां यवाबाने जेथे शूर माणसे आहेत ह्मणून त्याला कळले त्या ठिकाणी उरी- याला नेमले; तेव्हां कित्येक लोक पडले आणि उरीयाही मेला. मग यवाबाने पाठवून दावीदाला गोष्ट कळविल्यावर त्याने बथशेबाला आपल्या घरी आणून ती आपली बायको करून घेतली. _*) आळस हा सर्व दुर्गुणांचे मूळ आहे.-परमेश्वराच्या लढाया स्वता कराव्या है दावीदाचे कर्तव्य होते. एकादें पाप एकटंच क्वचित राहते. तर पापाला पाप जउने. त्याप्रमाणे दावीदा विषयीं झालें. जेव्हां दावीद ऐषभाराम करूं लागला तेव्हां तो व्यभिचारी व घातकी झाला. २. तेव्हां परमेश्वराने नाथान भविष्यवादी याला दाबीदाकडे पाठवन मटले: "एका नगरांत दोन मनुष्य होते, एक द्रव्यवान व एक दरिद्री. द्रव्यवानाला मेंढरे व गुरे फारच होती. परंतु त्या दरिद्याला एक लहान को- करी इजवांचून कांही नव्हते. ती त्याच्या तुकड्यांतले खाई व त्याच्या प्या- ल्यांतले पिई व त्याच्या उरासी निजे. आणि कोणी एक वाटसरू त्या धनवाना- जवळ आला त्यासाठी तयार करायास त्याने आपल्या मेंढरांतून कांहीं नघेतां