पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ६६ दावीदास देवाचे वचन. मटले "पाहा, मीएरेज लांकडांच्या घरांत राहतो, आणि परमेश्वराचा कोश पडद्यांमध्ये राहतो." नाथान ह्मणाला : "जे तुझ्या मनांत असेल ते सर्व कर, कांकी परमेश्वर तुजसंगतीं आहे."-आणि त्या रात्री परमेश्वराचा शब्द नाथानाकडे असा आला की: “जाऊन माझा सेवक दावीद याला सांगः परमेश्वर असे ह्मणतो, तुला माझ्या नांवासाठी मंदिर बांधावयाचे नाही, कां कीं तूं लढायांचा मनुष्य असून रक्त पाडले आहे, *) परंतु जे तुझें संतान तुझ्या पोटचे होईल, ते तुझे दिवस समाप्त झाल्यावर माझ्या नांवा- साठी मंदिर बांधील आणि त्याच्या राज्याचे आसन मी सर्वकाळ स्था- पीत करीन. मी त्याचा बाप होईन व तो माझा पुत्र होईल. तुझें घर व तुझें राज्य तुझ्या देखतां सर्वकाळ स्थापीत होईल. तुझें आस- न सर्वकाळ' स्थापीत राहील"t). मग दावीद बोलालाः " हे प्रभू परमेश्वरा, मी कोण व माझे कुल काय की खा एथपर्यंत मला आणिले आहे? आणि, हे प्रभू , तूं आपल्या सेवकाच्या घराण्याविषयी पुढे बहुत वेळाचेही बोलला आहेस."-आणि त्यानंतर असे झाले की दावीदाने पलिष्टयांस मारून जिंकिले. मवाबी व अरामी व अटोमी या सर्वांवर जय पावून त्याने त्यांस स्वाधीन केले आणि त्यांच्या नगरांत ठाणी बसविली). आणि दावीद जेथे कोठे जाई तेथे परमेश्वर त्याचे तारण करी.

  • ) देउळ शांतीचे स्थान आहे यासाठी शांतीचा राजा (शलमोन-शातवंत) याने

ते बांधावे हे योग्यच होते. + हे जे भविष्यवचन आहे ते पहिल्याने शलमोनाविषयों आहे. परंतु दावीदाचा पत्र आणि प्रभु जो खीस्त (माथी २२, ४२) तो खरा शांतीचा सरदार असन त्या- कडून हे वचन परिपूर्ण झाले आहे. ज्यामध्ये देवाचे खरे भक्त आत्म्याने व खरेपणाने देवाला भजतात (योह०४, २३) ते देऊळ ( भक्तमंडची ) त्याने बांधले आणि त्याचेंच सिंहासन बापाच्या उजव्या हाताकडे सर्वकाळपर्यंत टिकणारे आहे.-वरील भविष्य- वचनावरून मशीहा दावीदाच्या घराण्यांत जन्म घईल असी इस्राएली आशा धरीत. t) दावीद लढाया करून जय पावला आणि त्याच्या दिवसांत इस्राएलाचे राज्य जित- विस्तीर्ण व बळकट होते तसे पूर्वी किंवा नंतर कधीच झाले नाही, ते राज्य फराय नदीपासन भूमध्यसमुद्रापर्यन, आणि लबानोन डोंगरापासून अरवी आखातापर्यंत होते.