पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० दावीदास देवाचे वचन. प्रक० ६६ मिळून यासीं करार केला. यावरून दावीदाचा सेनापति जो यवाब त्याने क्रोधाक्रांत होऊन अबनेराचा घात केला. हे ऐकून दावीदाने अबनेरा- विषयीं शोक केला आणि ह्मणालाः “अबनेर याच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे ते यवाबाच्या डोक्यावर पडो." आणि ईश्वोशेथाने दोन वर्षे राज्य केल्यावर दोन सरदारांनी येऊन तो निद्रिस्त असतां त्याला जिवे मारिलें आणि ईश्बोशेथाचे शीर दावींदापासीं आणले. तेव्हां घात करणाऱ्यांस ठार मारावे ह्मणून दावीदाने आपल्या चाकरास आज्ञा केली. नंतर इस्राएलाचे वरकड सर्व वंश दावीदाकडे हेब्रोनांत येऊन दावीदाला राजा होण्यास अभिषेक केला. त्यावर राजाने यरूशलेमास जाऊन देशांत राहणारे यवूसी यांवर चढून सीयोनेचा कोट घेतला. मग दावीद कोटांत राहिला व याला दावीदाचे नगर असे मटले. २. मग दावीद उठून गिब्यांतील अबीनादाबाच्या (प्रक० ५८ क०५) घरांतून देवाचा कोश आणायास गेला, आणि बैल रस्ता सोडून गेल्या- मुळे उज्जाने आपला हात कोशाला लावून तो धरला. तेव्हां देवाने त्याला त्याच्या चुकीमुळे हाणले आणि तो तेथें मेला *). मग दावीद भिऊन कोश दावीदाच्या नगरांत नेईना, पण त्याने तो ओबेद अदोम जो लेवी त्याच्या घरी नेऊन ठेवला. आणि परमेश्वराने त्याला व त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद दिला हे पाहून दावीदाने व सर्व इस्राएलांनी मोठा हर्ष करीत व शिंगे वाजवीत देवाचा कोश आपल्या नगरांत आणला. तेव्हां दावीद परमेश्वरासमोर सर्व शक्तीने नाचत चालला.

    • ) " पवित्र वस्तूला शिवू नये, शिवले तर मरतील" अमी शास्त्रांत (गण० ४,

१५) आज्ञा दिली होती (प्रक०५८ क०५. टीका २ पाहा). या कारणास्तव कोश उचलून नेते वेळेस लेवी यांनी तो शिवू नये झणून कोशाच्या बाजूप्त कड्या लावून त्यातून काठ्या घातल्या होत्या. प्रक० ६६. दावीदास देवाचें वचन. २ शमु० ७-१०. (१ काल० १८-२१). आणि परमेश्वराने राजाला त्याच्या सभोवतील सर्व शत्रूपासून स्वस्थ केले, तेव्हां तो आपल्या घरी बसला, आणि त्याने नाथान भविष्यवाद्याला