पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ६५] दावीदाचा राज्याधिकारांत प्रवेश. २. आणि अखीशाने दावीदाला मटले : "तूं आपल्या मनुष्यांसुद्धां आमच्या संगती लढाईस चल." दावीद ह्मणाला : "आपला दास काय करील हे तूं खचीत जाणसील.' परंतु पलिष्टयांचे सरदार दावीदावर भरवसा न ठेवून अखीशाला ह्मणाले "या माणसाला परत जायाचा निरोप दे, नाही तर तो लढाईत आह्मांविरुद्ध फितूर करील." मग अखी- शाने दावीदाला बोलावून मटले: “तुझी वर्तणूक मला बरी वाटली आहे, तुझ्या ठायीं कांही वाईट मला सांपडले नाहीं तथापि सरदारांच्या मनांत तूं येत नाहींस, ह्मणून आतां निघून शांतीने जा." तेव्हां दावीद व त्या- ची माणसे निघून गेली.-पलिष्टी तर इस्राएलासी लढले आणि इस्राए- लाची माणसे पलिष्टयांपुढून पळून गेली आणि शौलाला धनुर्धरांचे बा- ण लागून तो जखमी झाला. तेव्हां तो आपल्या शस्त्रवाहकाला ह्मणा- लाः “तरवार काढून मला भोसकून ठार मार, नाहीतर पलिष्टी येऊन माझा अपमान करतील.” परंतु त्याचा शस्त्रवाहक मान्य होईना. तेव्हां शौल आपली तरवार घेऊन तीजवर पडून मेला, आणि त्याचे तीन पुत्र लढाईच्या गर्दीत मरण पावले. मग दावीदाने शौल व योनाथान यांक- रितां हा विलाप केला कीः "इस्राएलाची शोभा उंच स्थानी मारली आहे! शूर कसे पडले आहेत!. . . . . . माझ्या भावा योनाथाना, तुजसाठी मला दुःख आहे; तूं मला प्रिय होतास मजवर तुझी प्रीति आश्चर्याची होती, बायकांच्या प्रीतीपेक्षा अधिक होती." प्रक० ६. दावीदाचा राज्याधिकारांत प्रवेश. २ शमु० २- ६. (१ काल० १-१७.) १०५५ इसवी सनाच्या पूर्वी. १. नंतर यहूद्याच्या माणसांनी येऊन हे ब्रोनांत दावीदाला आपल्या वंशावर राजा होण्यास अभिषेक केला. परंतु अबनेराने शौलाचा पुत्र ईश्बोशे- थ याला इस्राएलाच्या वरकड वंशांवर राजा करून ठेवले. आणि शौलाचें कल व दावीदाचे कुल यांमध्ये लढाई बहुत काळ चालली. आणि दावीद बळवान होत चालला परंतु शौलाचे कुल अशक्त होत चालले. आणि अब- नेर व ईश्बोशेष यांमध्ये कलह उत्पन्न होऊन अबनेराने दावीदाच्या पक्षास