पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ शौलाचे मरण. [प्रक० ६४ आपल्या ठिकाणास परत गेला. परंतु दावीदाने आपल्या मनांत झटले कधी तरी मी शौलाच्या हातून नाश पावेन. तर पलिष्टयांच्या मुलखांत म्या पळून जाऊन निभवावे याहून मला कांहीं बरे नाही. तेव्हां तो उठून आपल्या ६०० मनुष्यां बरोबर अखीशाकडे गेला. आणि दावीद पलि- ष्ट्यांकडे पळून गेला हे ऐकून शौलाने त्याचा अणखी शोध केला नाही. प्रक० ६४. शौलाचें मरण. (१ शमु० २८ - ३१.२ शमु० १). १. आणि शमुवेल मेला तेव्हां सर्व इस्राएलांनी त्याविषयीं शोक केला. पलिष्टी तर फिरून इस्राएलासी लढाई करायास निघाले, तेव्हां शोलाचे मन फार घाबरे झाले. आणि शौलाने परमेश्वराला विचारले, तेव्हां परमेश्वराने त्याला स्वप्नाकडून किंवा उरीम व थुम्मीम यांकडून किंवा भविष्यवाद्यांकडून कांहीं उत्तर दिले नाही. मग शौल आपल्या चाक- रांस ह्मणालाः “मजसाठी जादुगिरीणीचा शोध करा, ह्मणजे मी तिजवळ पुसेन.” (पूर्वी तर परमेश्वराने नियमशास्त्रांत (लेवी० १९, ३१; २०, २७) आज्ञा दिली होती, त्याप्रमाणे शौलाने स्वतां मांत्रिक व जादुगीर यांस देशांत नाहींसे केले होते). त्याचे चाकर त्याला ह्मणाले: " पाहा, एनदोरास जादुगिरीण आहे." मग शौलाने सोंग घेऊन रात्री त्या बायकोकडे जाऊन मटले “मजसाठी शमुवेलाला वरते आण." आणि बायकोने शमुवेलाला पाहिले, तेव्हां ती भिऊन मोठ्याने ओरडली आणि ह्मणाली: “मी देवांस भूमीतून वर येतां पाहते; म्हातारा माणूस झगा घातलेला भूमीतून वर येत आहे." तेव्हां हा शमुवेल आहे असे शौलाने जाणून भूमीकडे लवून झटलेः “मला फार संकट झाले आहे, पलिष्टी मजसी लढायास मिळाले आहेत आणि देव मला सोडून उत्तर अणखी देत नाही, मला काय करायाचे, हे खा मला कळवावे, ह्मणून म्या तुला बोलाविले आहे." तेव्हां शमुवेल म्हणालाः "जसें परमेश्वराने मजकडून तुला सांगितले तसे त्याने आपले केले आहे. त्याने राज्य तुझ्या हातांतून घेतले आहे, उद्यां तूं आपल्या पुत्रांसद्धां मजकडे येसील." हे ऐकून शौल भयभीत होऊन लागलाच भूमीवर पडला. मग त्याला शक्ति येऊन तो उठून निघून गेला.