पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ६३ दावीदाचा पाठलाग. १४७ आपल्या माणसांस झटले: “म्या आपल्या धन्यावर आपला हात घालावा, असी गोष्ट परमेश्वराने मजकडून घडू देऊ नये, कांकी तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे." मग शौल उठून गुहेतून वाटेने चालला, नंतर दावीद गुहेतून निघाला आणि शौलाच्या पाठीमागे हाक मारून बोललाः "हे माझ्या प्रभू राजा, पाहा, याच दिवसीं खा आपल्या डोळ्यांनी पाहावे की परमेश्वराने गुहेमध्ये आज तुला माझ्या हाती दिले. तुझा वस्त्रकांठ माझ्या हाती पाहा. यावरून माझ्या ठायीं दुष्टाई किंवा फितूर नाही असे समजून पाहा. माझा तुझा न्याय परमेश्वर करो, परंतु माझा हात तुजवर पडणार नाही." तेव्हां शौल गळा काढून रडला आणि ह्मणाला. "माझ्या पुत्रा दावीदा, मजपेक्षा तूं नीतिमान आहेस. आज जे बरे मजसीं केलें यावरून परमेश्वर तुझें बरे करो. तर आतां पाहा, तूं खचीत राजा होसील हे मी जाणतो; तरतूं माझ्या मागे माझे संतान नाहीसे करणार नाहीस असी परमेश्वराची शपथ मजसी वाहा." तेव्हां दावीदाने त्यासी शपथ वाहिली. मग शौल आपल्या घरी गेला. ३. नंतर शोल फिरून ३००० मनुष्यांस बरोबर घेऊन जीफ रानांत दावीदाचा शोध करायास गेला. तेव्हां दावीद अबीशा (त्याचा भाचा) यास बरोबर घेऊन रात्री छावणीत शौलाकडे गेला आणि पाहा, शौल निजला व त्याचा भाला त्याच्याजवळ भूमीत रोवला व त्यासभोवते अवघे लोक निजले आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हां अबीशा ह्मणाला: "मला भाल्याने एकदां त्याला भूमीवर ठार मारूं दे.” परंतु दावीद मना करून ह्मणाला : “परमेश्वराच्या अभिषिक्तावर कोण आपला हात टाकून निर्दोष राहील! भाला व त्याचा पाण्याचा चंबु घे मग आपण जाऊं." मग कोणास न कळतां व कोणी जागा न होतां ते निघन गेले. कारण त्यांवर परमेश्वराकडून गाढ झोप पडली होती. आणि दावीद पलि- कडे डोंगराच्या शिखरावर जाऊन दूर उभा राहिला आणि लोकांस हाक मारून व अबनेर जो सेनापति त्याचा निषेध करून बोलला की : "तूं वीर नाहींस काय? तर खा आपला प्रभू राजा याला कां राखिले नाहीं? राजाचा भाला व पाण्याचा चंबु त्याच्या उशापासीं होता तो कोठे आहे पाहा!" सांगोल दावीदाची वाणी ओळखून ह्मणाला:" माझ्या पुत्रा दावीता म्या पाप केले आहे; मी तुझे वाईट अणखी करणार नाही." मग शौल