पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ दावीदाचा पाठलाग. प्रक०६३ पवित्र भाकर खायास दिली, कांकी तिजशिवाय तेथे भाकर नव्हती,आणि त्याने त्याला गल्याथाची तरवारही दिली. मग दावीद पलिष्टयांचा राजा आखीश याकडे गेला. तेव्हां राजाचे दात ह्मणाले: "देशाचा राजा दावीद हा आहे की नाही? शौलाने हजार व दावीदाने दहा हजार मार- ले आहेत, असे त्याविषयीं गात ह्मणत होते की नाही?" तेव्हां दावीद फार भ्याला आणि त्याने आपली वहिवाट पालटून त्याजवळ वेड घेतले. मग आखीशाने त्याला आपणापासून लावून दिले. तेथून निघून दावीद अदुलाम गुहेत पळून गेला. आणि त्याचे भाऊ व त्याच्या बापाचे घरचे सर्व त्याज- कडे आले. आणि कोणी अडचणीत पडलेले व कोणी त्रासलेले ते सर्व सुमारे ४०० माणसे याकडे होती आणि तो त्यांचा सरदार झाला. मग दवेग जो अदोमी त्याने अहिमलखाने दावीदाला अन्न व तरवार दिली हे पाहून शौलाला सांगितले. तेव्हां शौलाने अहिमलेख याला व त्याच्या बा- पाचे सर्व कुटुंब यांस बोलावून त्यांस जिवे मारण्याविषयी आपल्या जवळच्या चाकरांस आज्ञा केली. परंतु ते परमेश्वराच्या याजकांस जिवे मारण्या- करितां आपले हात लांब करीनात. मग दवेगाने याजकांस जिवे मारिले, आणि त्याच दिवसी ८५ माणसें मेली. परंतु अहिमलेखाचा एक अब्या- थार नांवाचा पुत्र सुटून आपल्या संगतीं एफोद आणि उरीम व थुम्मीम आणून दावीदाकडे पळून गेला. तेव्हां दावीद जीफ रानांत होता. मग जीफीनी जाऊन शौलाला सांगितले. तेव्हां शौलाने आपल्या मनुष्याकडून दावीदाला बेढिले. परंतु दूत येऊन शौलाला ह्मणालाः "लवकर ये, कां की पलिष्ट्यांनी देशावर घाला घातला आहे. तेव्हां शौल दावींदाचा पाठलाग सोडून पलिष्टयांसी लढायास गेला, २. आणि शौल पलिष्टयांपासून माघारा आला, तेव्हां दावीद एन- गदीच्या रानांत आहे असे त्याला कोणी सांगितले. तेव्हां शौलाने ३००० निवडलेल्या मनुष्यांस घेऊन दावीदाचा शोध करायास गेला. तेव्हां तो रानांतील एका गुहेत जाऊन बसला आणि दावीद व त्याची माणसे याच गुहेच्या बाजूस राहत होती. तेव्हा त्या माणसांनी दावीदाला झटले "परमेश्वराने तुला सांगितले की मी तुझे शत्रु तुझ्या हाती देईन तो हा दिवस पाहा." मग दावीदाने उठून शौलाचा वस्त्रकांठ हळूच कापून घेतला, परंतु यावरून दावीद मनांत दुःखी झाला. आणि त्याने