पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ६३] दावीदाचा पाठलाग. १४५ यास पाहत आहे ?" योनाथान ह्मणालाः “आपल्या बापाच्या मनांत तुज- विषयीं चागले किंवा वाईट आहे हे मी समजून घेईन. तीन दिवसांनी येऊन एजेल नामें जाग्यांत लपून राहा आणि मी तेथे तीन बाण निशा- ण मारल्याप्रमाणे मारीन. तेव्हां जर मी पोराला ह्मणेन : पाहा, बाण तया आलिकडे आहेत घेऊन ये, तर तूं ये, कां की तुझे कुशल आहे. परंतु जर मी ह्मणेन: पाहा, बाण तुझ्या पलिकडे आहेत, तर तूं निघून जा, कां की परमेश्वराने तुला जाऊ दिले आहे. आणि ज्या गोष्टीविषयी तूं व मी बोललो आहो, पाहा, परमेश्वर मजमध्ये व तुजमध्ये निरंतर असो." मग अमावास्या आली, तेव्हां राजा जेवायास बसला परंतु दावीदाची जागा रिकामी होती. तेव्हां शौलाने योनाथानाला ह्मटले: “इशायाचा पत्र काल व आजही जेवायास कां आला नाहीं?" आणि योनाथान त्याचे निमित्त करूं लागला तेव्हां शौल रागे भरून ह्मणालाः “अरे दुष्ट फितूर- खोर पत्रा, तुझ्या फजिती व तुझ्या आईच्या फजिती होण्यास तूं इशायाच्या पुत्रासी जडलास, हे मला ठाऊक नाहीं काय? जोपर्यंत तो पृथ्वीवर वांचेल तोपर्यंत तं व तुझें राज्य स्थापित होणार नाही? तर आतां पाठवून त्याला मजकडे आण, कां की त्याला खचीत मारायाचे आहे." मग योनाथा- नाने उत्तर केले: “याला कां मारावे? त्याने काय केले आहे." तेव्हां शौलाने त्याला वधायास भाला फेंकला, यावरून दावीदाला जिवें मारायाचा निश्चय आपल्या बापाने कला आहे हे योनाथानाला कळले. तेव्हां तो उठून निघाला आणि रानांत जाऊन त्याने बाण मारून आपल्या पोराला हाक मारून ह्मटले की "बाण तुझ्या पलिकडे आहे, धांवत जा." आणि पोर बाण जमा करून आला, परंतु त्याला काही ठाऊक नव्हते. तेव्हां योनाथानाने हत्यारे आपल्या पोराला देऊन नगरांत पाठविले. तो गेल्यावर दावीद उठून आला, आणि ते एकमेकांचे चुंबन घेऊन एकमेकांसाठी रडले. प्रक० ६३. दावीदाचा पाठलाग. (१ शमु. २१ –२७). १. आणि दावीद नोबास अहिमलेख याजकाजवळ आला आणि त्याला भूक लागली असतां अहिमलखान त्याला (मंदिरांतली) समोरची 19 II