पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ दावीद आणि योनाथान. [प्रक० ६२ दूर करून त्याला हजारांचा सरदार करून ठेवले आणि दावीद आपल्या सर्व कार्यांमध्ये चतुराईने वर्तत असे व परमेश्वर त्यासंगतीं होता. हे पाहून शौल त्याचे भय धरीत असे, आणि त्याने आपली कन्या मीखल त्याला बायको करून दिली. २. नंतर दावीदाला जिवे मारावे असे शौलाने आपला पुत्र योनाथान याला व आपल्या सर्व चाकरांस सांगितले. तथापि योनाथानाने आप- ल्या बापाला दावीदाविषयी बरे बोलून झटले : “राजाने आपला चाकर दावीद यावर पाप करूं नये, कां की त्याने तुजवर पाप केले नाही, तर त्याने तुजसी फार चांगली कृत्ये केली आहेत. तेव्हां शौलाने योनाथानाचे ऐकिले आणि शपथ वाहून झटले : “परमेश्वर जिवंत आहे, दावीद मर- णार नाही.” परंतु दुष्ट आत्मा शौलाला लागला आणि दावीद वाजवीत असतां शौलाने भाला दावीदाकडे फेंकला, परंतु तो भिंतींत रुतला आणि दावीद पळून निभावला. मग दावीदावर टपून सकाळी त्याला जिवे मारावे ह्मणून शौलाने त्याच्या घरास दूत पाठविले. तेव्हां मीखल इने दावीदाला एका खिडकीतून उतरिले आणि तो तसाच निभा- वून गेला. मग मीखलीने मूर्ती घेऊन पलंगावर ठेवून "त्याच्या जिवाला बरे नाही" असे मटले. मग शौलाने पाठवून मटले की: "म्या त्याला जिवें मारावे ह्मणून त्याला पलंगावर असतां मजकडे आणा." आणि दूत घरांत आले तेव्हां पाहा पलंगावर मूर्ती आहे.-आणि दावीद शमुवेलाकडे रामा- स गेला. तेव्हां शौलाने त्याला तेथून आणायास दूत पाठविले. परंतु त्यांनी भविष्यवाद्यांची मंडळी भविष्यवाद करितां व शमुवेल त्यांवर नेम- लेला उभा राहातां पाहिला, तेव्हां देवाचा आत्मा शौलाच्या दूतांवर आला आणि तेही भाविष्यवाद करूं लागले. मग त्याने आणखी दूत पाठविले व तिसऱ्या वेळेस पाठविले तेही भाविष्यवाद करूं लागले. तेव्हां शौल स्वतां रामास गेला आणि देवाचा आत्मा त्यावरही आला आणि तो भविष्य- वाद करूं लागला. यावरून "शौलही भविष्यवाद्यांमध्ये आहे काय?" असी ह्मण पडली. १३. आणि दावीद रामापासून पळून योनाथानाकडे येऊन त्याला तुझ्या बापाचा म्या काय अपराध केला की तो माझा जीव ध्या-